-
संग्रहित छायाचित्र
-
तातडीने डिलीट नाही करणार अकाउंट :- १५ मे पर्यंत नवीन पॉलिसी न स्वीकारल्यास कंपनी तुमचं WhatsApp अकाउंट तातडीने डिलीट करणार नाही. मात्र जोपर्यंत पॉलिसी स्वीकारत नाहीत तोपर्यंत WhatsApp वापरण्याचा पूर्ण अॅक्सेस तुम्हाला मिळणार नाही, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच WhatsApp चे सर्व फिचर्स तुम्हाला वापरता येणार नाहीत.
-
मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत :- पॉलिसी न स्वीकारल्यास काही कालावधीसाठी युजर्सना कॉल्स आणि नोटिफिकेशन्स येतील, पण मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत.
-
डिलीट झालेलं अकाउंट पुन्हा वापरता येणार नाही :- एकदा तुमचं अकाउंट डिलीट झाल्यास पुन्हा ते अकाउंट तुम्हाला वापरता येणार नाही. व्हॉट्सअॅपकडून कायमस्वरुपी अकाउंट डिलीट केलं जातं. अकाउंट डिलीट झाल्यानंतर युजरला त्याचा कोणताच डेटा पुन्हा भेटणार नाही. त्याचे सर्व मेसेज आणि डॉक्युमेंट्स डिलीट होतील.
-
संग्रहित छायाचित्र
-
WhatsApp backup डिलीट होणार :- पॉलिसी न स्वीकारणाऱ्या युजर्सचा पूर्ण WhatsApp backup देखील डिलीट होईल. १५ मेपूर्वी जर तिम्ही बॅकअप एक्सपोर्ट केला तर तुमचा डेटा सुरक्षित राहू शकतो.
-
१५ मेपर्यंत चॅटिंग हिस्ट्री सेव्ह करता येणार :- १५ मे आधी युजर त्याची चॅटिंग हिस्ट्री अँड्रॉइड किंवा आयफोनवर एक्सपोर्ट करु शकतात, तसेच अकाउंट रिपोर्टही डाउनलोड करु शकतात.
-
१५ मे नंतरही स्वीकारता येणार पॉलिसी :- तुम्ही १५ मे नंतरही नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारु शकतात. त्यावेळी निष्क्रिय वापरकर्त्यांशी संबंधित धोरण लागू होईल असं कंपनीने सांगितलंय. एकदा पॉलिसी स्वीकारल्यानंतर डिव्हाइसवर स्टोअर असलेला तुमचा सर्व डेटा तुम्हाला मिळेल.
-
नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी असल्याचा दावा : पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही, असं स्पष्टीकरण WhatsApp कडून पुन्हा एकदा दिलं आहे. तसेच, नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा दावाही कंपनीने केलाय.
-
फटका बसल्यानंतरही नवीन पॉलिसी लागू करण्याची पूर्ण तयारी : दरम्यान, नवीन पॉलिसी आणल्याचा फटकाही WhatsApp ला बसला असून प्लॅटफॉर्म सोडून जाणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सिग्नल, टेलिग्राम आणि संदेश यांसारख्या अॅप्सवरील युजर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात वादग्रस्त प्रायव्हसी पॉलिसीला काही दिवस स्थगिती दिल्यानंतर आता १५ मे पासून WhatsApp ने पुन्हा एकदा तिच पॉलिसी लागू करण्याची पूर्ण तयारी केली आहे.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा