-
सुदृढ आणि निरोगी आरोग्य हवं असेल तर आहारात फळे आणि कडधान्यांचा आवर्जुन समावेश केला पाहिजे. अनेकदा डॉक्टरदेखील लहान मुलांना किंवा वयस्क व्यक्तींना फळे खाण्याचा सल्ला देतात. परंतु, अनेक जण फळं खाण्यास कंटाळा करतात. मात्र, फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असण्यासोबतच काही गुणकारी गुणधर्मदेखील असतात. त्यामुळे आज सीताफळ खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
-
शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर होते.
-
शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.
-
रक्ताचे प्रमाण वाढते.
-
सीताफळ खाल्ल्यानं वजन वाढण्यास मदत होईल.
-
अपचन, अरुची दूर होते.
-
छातीत, पोटात जळजळ जाणवत असेल तर सीताफळ खाल्ल्यानं आराम पडतो.
-
उष्णतेचे विकार दूर होतात.
-
हृदयासाठी फायदेशीर
-
सीताफळाच्या बिया वाटून केसांना लावल्यास डोक्यातील उवा मरतात.
-
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS