-
शरीराच्या योग्य वाढीसाठी पोळी, भाजी, भात या पदार्थांची आवश्यकता आहे. तशीच दूध आणि दुग्दजन्य पदार्थांचीही तितकीच गरज असते. त्यामुळे दही, ताक, लोणी आणि तूप यांचा आहारात समावेश करावा. तूपामुळे वजन वाढतं किंवा स्थुलता येते असा अनेक जणांचा गैरसमज आहे. मात्र, तसं अजिबात नसून तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. त्यामुळे आहारात दररोज साजूक तुपाचा वापर केला पाहिजे. तूप खाण्याचे काही फायदे.
-
तूपाचं सेवन केल्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही.
-
डोळ्यावरील ताण कमी होतो.
-
वात असल्यास तुपाच्या सेवनाने तो कमी होतो.
-
पचनक्रिया सुधारते आणि अपचन, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.
-
तूप योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा हृदयाला फायदा होतो.
-
त्वचेचा पोत सुधारतो आणि रंग उजळ होतो.
-
तुपामुळे वजन वाढत नाही.
-
तुपातील ‘कोलीन’ हे तत्त्व स्मरणशक्तीसाठी उपयुक्त असते.
-
रोजच्या जेवणात २ छोटे चमचे भरून तूप घ्यावे. तूप पातळ असल्यास त्याचे प्रमाण थोडेसे अधिक चालू शकेल.
-
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”