-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. अभिनेत्री रुबिना दिलैकने 'बिग बॉस १४' या पर्वाचं विजेतेपद पटकावले.
-
रुबिनाला नुकताच करोना झाला होता आणि त्यावर तिने यशस्वीरित्या मात केली.
-
तिने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत करोनातून लवकर बरं होण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी केल्या त्या सांगितल्या आहेत.
-
रुबिना १९ दिवस होम क्वारंटाईन होती.
-
होम क्वारंटाइनच्या काळात रुबिनाने पौष्टिक आहार घेतला. पौष्टिक आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
-
या काळात कोणताही त्रास होऊ नये म्हणून खाण्या-पिण्याच्या बाबतीत तिने विशेष काळजी घेतली.
-
या काळात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.
-
रुबीनाने योगासनं करण्यावर भर दिला. आपल्या योग व ध्यानधारणेच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये प्राणायामाचा समावेश असायलाच हवा.
-
रुबिनाने वेळेवर औषध घेतली.
-
करोनाच्या या कठीण काळात सकारात्मक राहण्यासाठी रुबिनाला गाण्यांची साथ लाभली. चांगली गाणी ऐकल्याने मन प्रसन्न होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुबिना दिलैक / इन्स्टाग्राम)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..