-
करोनाच्या कठीण काळात फिट राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. विशेष: काय खायला हवं आणि काय नाही याकडे आपण लक्ष देतो. परंतु जेवणानंतर आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याचा आपण कधी विचार केला का? आपण अनेकदा जेवल्यानंतर काही अशा गोष्टींची सवय लावूण घेतो ज्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आज आपण जेवणानंतर लगेच कोणत्या गोष्टी करू नये हे जाणून घेणार आहोत.
-
पाणी – पाणी हे आपल्या शरीरासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपलं शरीर हे हायड्रेटेड असणं महत्त्वाचं आहे. परंतु जेवणानंतर लगेच पाणी पिल्यास आपल्याला अॅसिडी होऊ शकते.
-
फळे – फळे आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगली असतात. परंतु जेव्हा आपण जेवणानंतर लगेच फळे खातो तेव्हा आपल्या पचन क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जेवणानंतर लगेच फळे खाऊ नये.
-
गरम चहा किंवा कॉफी – आपल्यापैकी अनेकजण जेवल्यानंतर चहा किंवा कॉफी पितात. मात्र, हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. कारण चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या अॅसिड्समुळे पचनक्रिया मंदावते. सोबतच निद्रानाश समस्या होऊ शकतात. त्यामुळे जेवणच्या तासाभरानंतर कॉफी किंवा चहा प्यायल्यास हरकत नाही.
-
व्यायाम – पोट भरून जेवण केल्यानंतर जीमला जाण्याचा विचार तुम्ही करत असाल तर ते टाळा. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ ठरलेली असते. जेवणानंतर व्यायाम केल्यास सुस्तपणा येतो.
-
फिरायला जाणे – अनेक लोक जेवण झाल्यानंतर अन्नपचन होण्यास मदत होईल, या विचाराने लगेच फिरायला जातात. मात्र, हे खरं नाही. तुम्ही जेवणानंतर फिरायला जाऊ शकतात, पण कमीत कमी ३० मिनिटांनी कारण अन्न पचनाची थोडी प्रकिया ही आधी झाली पाहिजे.
-
धुम्रपान – जेवणानंतर धुम्रपान करणे म्हणजे एकावेळी १० सिगारेट ओढण्यासारखे आहे. हे खरं असू द्या किंवा खोटं पण धुम्रपान करने आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे.
-
अंघोळ – जेवणानंतर अंघोळ केल्याने पचन क्रिया मंदावते. त्यामुळे जेवणाच्या तासभरानंतर अंघोळ केली पाहिजे.
-
झोप – जेवण केल्यानंतर लगेच झोपायला तुम्हाला आवडते तर तुम्हाला ही सवय सोडण्याची गरजं आहे. कारण तज्ञांच्या मते ही एक हानिकारक सवय आहे. कारण, जेवल्यानंतर तुम्ही लगेच झोपलात तर तुमच्या पोटात तयार होणारे पाचक रस वाढतात आणि त्यामुळे छातीत जळजळ होते.
-
यामुळे संपूर्ण पाचन प्रक्रियेवर परिणाम होतो. एवढंच नाही तर त्यामुळे वजन वाढते.

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा