-
मुलगी वयात येताच 'ब्रा' तिच्या आयुष्यात येते. प्रत्येक मुलीची पहिली ब्रा आई किंवा ताईच्या मदतीने घेतली जाते. त्यानंतर कित्येक वर्ष एकाच प्रकारची ब्रा बऱ्याच मुली वापरत असतात. साईझच्या निवडीतसुद्धा अज्ञानामुळे काही चुका होतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
-
कॉटन ब्रा ही प्रत्येक मुलीच्या माहितीची आणि गरजेची. रोजच्या वापरासाठी सुटसुटीत कॉटन ब्रा कित्येक मुली वापरतात. पण ब्रा आणि ड्रेसचा रंग जुळून येईल, हे पाहणं गरजेचं असतं. बऱ्याचदा विशिष्ट रंगाचं इनर नसल्यास काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा पर्याय वापरला जातो. पण पांढऱ्या रंगाचे इनर प्रकाशात दिसून येते. न्यूड रंगाचे इनर तुम्हाला याबाबत कधीच दगा देत नाही. इनरचा प्रकार कोणताही असो, न्यूड रंगाचे इनर सर्व रंगांसोबत वापरता येतं.
-
ब्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या गरजेनुसार काही प्रसंगांत योग्य प्रकारची ब्रा निवडणं गरजेचं असतं. कॉटन ब्रामध्ये कप्स नसतील, तर त्याला चुण्या पडतात. फिटेड ड्रेस ब्राला चिटकून बसल्याने या क्रीझ त्यावर स्पष्ट दिसतात. अशा ड्रेससाठी कप्स असलेली पॅडेड ब्रा वापरावी.
-
जिममध्येसुद्धा घामामुळे कॉटन ब्रा नकोशी वाटते. अशा वेळी 'रेसर ब्रा' किंवा 'स्पोर्ट्स ब्रा' वापरता येतात. व्यायाम करणाऱ्या सर्वासाठी ही अत्यावश्यक.
-
हॉल्टरनेक, बॅकलेस, वन शोल्डर ड्रेस घालताना गळ्याच्या आकारानुसार ब्राची स्ट्रॅप आत लपणं गरजेचं असतं. अशा वेळी 'कन्व्हर्टेबल' किंवा 'मल्टीवे ब्रा' वापरता येतात. याशिवाय तुमच्या ब्रेस्टच्या आकारानुसार 'पुश-अप ब्रा', 'फुल कव्हर ब्रा' अशा विविध प्रकारच्या ब्रा बाजारात उपलब्ध आहेत.
-
एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, प्रत्येक वेळेस वजन कमी किंवा जास्त झाले तर आपल्या छातीचे मापसुद्धा कमी जास्त होते. दर थोड्या महिन्यांनी जेव्हा तुम्ही नवीन अंतर्वस्त्र खरेदी करता तेव्हा प्रत्येक वेळेस तुमचे माप घेऊनच ती खरेदी करा.
-
कोणत्याही चांगल्या सहकाऱ्याप्रमाणेच तुमच्या ब्रानेसुद्धा तुम्हाला अवघड प्रसंगी आधार देणे अपेक्षित असते. जर तुम्ही छातीकडे भरलेल्या असाल तर नाजूक बारीक पट्टे असलेल्या ब्रा घेण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या छातीला व्यवस्थित आधार आणि आकारसुद्धा देईल अशीच ब्रा असायला हवी.
-
पुश-अप हा प्रकार खूप लोकप्रिय होतो आहे. या घातल्यानंतर अधिक सुडौलपणा आणि गोलाई जाणवते.
-
अंडर वायर फुल कप जरा मोठ्या मापाच्या स्त्रियांसाठी योग्य या सॉफ्ट आणि मोल्डेड कफ्समध्ये मिळतात. खालच्या बाजूला असलेल्या वायरमुळे छान आधार मिळतो आणि छाती ओघळल्यासारखी दिसत नाही व बांधा सुडौल दिसायला मदत होते.
-
ड्रेसची गरज आणि तुमचा कंफर्ट बघून योग्य 'ब्रा'ची निवड करायला हवी.

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”