-
YouTube ने आता एक नवं फिचर लाँच केलं आहे. या फिचरचं नाव Super Thanks असं ठेवण्यात आलं असून या फिचरमुळे क्रिएटर्सना पैसे कमविण्याची नवी संधी उपलब्ध होईल. (Photo : Indian Express)
युजर्स एखाद्या क्रिएटरचा व्हिडिओ पाहत असतानाच सुपर थँक्स खरेदी करू शकतात. आपल्या आवडत्या क्रिएटरला समर्थन देण्यासाठी हे फिचर खरेदी केलं जाऊ शकते. (Photo : Express) त्याची किंमत २ डॉलरपासून (सुमारे १५० रुपये) सुरू होऊन ५० डॉलरपर्यंत (सुमारे ३,७३० रुपये) इतकी आहे. (Photo : Express) चाहत्यांनी या व्हिडिओ पेजवर केलेली खरेदी हायलाईट करण्यासाठी युट्यूबकडून कमेंटसोबतच अॅनिमेटेड GIF कलर्स ऍड केलं जाईल. सोबतच इथे क्रिएटर्सदेखील प्रतिसाद देऊ शकतात. (Photo : Reuters) -
आतापर्यंत एकूण ६८ देशांमधील डेस्कटॉप आणि मोबाईलवर क्रिएटर्स आणि व्ह्यूअर्ससाठी हे फिचर उपलब्ध आहे. तसेच Android आणि IOS या दोन्हीकडेही उपलब्ध आहे. (Photo : Indian Express)
-
२०२१ च्या अखेरपर्यंत आणखी जास्त क्रिएटर्सपर्यंत हे फिचर पोहोचण्याचा आपला प्रयत्न असल्याचं कंपनीने म्हटले आहे. (Photo : Reuters)
-
युट्युबने याबाबत असं सांगितले आहे कि, हे नवं फिचर प्रायव्हेट, एज रेस्ट्रिक्शन आणि अनलिस्टेड अशा काही प्रकारच्या व्हिडिओजसाठी उपलब्ध नसेल.
-
सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्सप्रमाणेच सुपर थँक्समार्फत फिचर कंटेंट क्रिएटर्सना आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होण्यासोबतच अधिक पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे. (Photo : Indian Express)
-
सुपर थँक्सचा अॅक्सेस मिळाला कि नाही? हे देखील तुम्ही तपासू शकता. सर्वप्रथम, YouTube क्रिएटर स्टुडिओमध्ये साईन इन करा आणि डाव्या बाजूच्या मेन्यूमध्ये मॉनेटायझेशनवर क्लिक करा. (Photo : Indian Express)
-
पुढे सुपर टॅबवर क्लिक करा. त्याठिकाणी तुम्हाला सुपर थँक्ससह ऑन आणि ऑफचा पर्याय दिसेल. अद्याप हा पर्याय दिसत नसेल तर तुम्हाला काही दिवस या फीचरची वाट पाहावी लागेल. (Photo : Reuters)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल