-
चेक प्रजासत्ताकमधील आघाडीची वाहन निर्मिती कंपनी असणाऱ्या स्कोडाने जून महिन्यामध्ये नवीन स्कोडा कुशाक (Skoda Kushaq) आणि स्कोडा ऑक्टीव्हिया (Skoda Octavia) सेडान बाजारात उतरवल्या. (सर्व फोटो स्कोडाच्या वेबसाइटवरुन साभार)
-
या गाड्या बाजारात आल्यानंतर या गाड्या भारतीय ग्राहकांच्या फारच पसंतीस उतरल्याचं चित्र दिसत आहे.
-
गाड्या बाजारामध्ये आल्यानंतर अवघ्या एका महिन्यात कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये २३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्कोडानेच जारी केलेल्या पत्रकामध्ये यासंदर्भातील माहिती दिलीय.
-
यंदा जुलै महिन्यामध्ये स्कोडा इंडियाने एकूण ३ हजार ८० गाड्यांची विक्री केलीय. मागील जुलैच्या तुलनेत हे प्रमाण २३४ टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात स्कोडाच्या केवळ ९२२ गाड्या विकल्या गेल्या होत्या.
-
मागील महिन्याच्या तुलनेत कंपनीने यंदा ३२० टक्के अधिक विक्री केलीय. जून २०२१ मध्ये कंपनीने ७३४ गाड्यांची विक्री केली होती.
-
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार स्कोडा कुशाकला भारतीय ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने गाड्यांच्या विक्रीत वाढ झालीय.
-
कुशाक गाडी बाजारात उतरवल्यानंतर एका आठवड्यामध्ये २००० जणांनी ही गाडी बूक केली.
-
तर जुलैच्या अखेरीसपर्यंत कुशाकसाठी बुकींग करणाऱ्यांची संख्या ६००० पर्यंत पोहचली.
-
स्कोडा कुशाक पेट्रोलमध्य दोन इंजिनच्या पर्यायासंहीत उपलब्ध आहेत. गाडीमध्ये १.० लीटर ३ सिलेंडर टीएसआय पेट्रोल आणि १.५ लीटर ४ सिलेंडर टीएसआय पेट्रोल असे दोन पर्याय देण्यात आलेत.
-
१.० लीटर इंजिन ११३ बीएचपीच्या क्षमतेने १७५ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करतं तर १.५ लीटर इंजिन १४८ बीएचपी क्षमतेने २५० एनएमचं पीक टॉर्क निर्माण करतं.
-
फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास स्कोडा कुशाकमध्ये १० इंचांचं इन्फोटेन्समेंट सिस्टीम देण्यात आलीय. ही सिस्टीम अॅपल कार प्ले आणि अॅण्ड्रॉइड ऑटो सपोर्टसहीत येते.
-
तसेच या एसयूव्हीमध्ये वायरलेस मिररलिंक, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, रेअरमध्ये एसी व्हेंटसारख्या सुविधा देण्यात आल्यात.
-
तसेच क्रूज कंट्रोल, अॅम्बियंट लायटींग, ७ स्पीकर्स म्यूझिक सिस्टीमही गाडीत देण्यात आलीय.
-
सनरुफ सहीत येणारी ही कॉमपॅक्ट एसयूव्ही प्रकारातील गाडी क्रेटा, किया सेल्टॉस, टाटा हॅरियर, रेनॉल्ट डस्टर आणि निसान किक्ससारख्या गाड्यांनी स्पर्धा करणार आहे.
-
स्कोडा कुशाकचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक असणारी ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही १० लाख ५० हजारांना (एक्स शोरुम प्राइज) उपलब्ध आहे.

लोकप्रिय मराठमोळी गायिका लवकरच होणार आई! लग्नानंतर तीन वर्षांनी दिली खुशखबर; शेअर केली खास पोस्ट