-
पावसाळा म्हटलं की रोगराई आलीच. पावसाच्या पाण्यामध्ये तयार होणाऱ्या डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारखे गंभीर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.
-
पावसाळा सुरु झाल्यानंतर ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे डास माश्यांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. त्यानंतर या डासांना घालवण्यासाठी किंवा त्यांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी नानाविविध उपाय केले जातात.
-
मॉस्किटो लिक्विड, कॉईल, अगरबत्ती यासारख्या उपयांद्वारे आपण डासांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. पण यातील काही विषारी घटकांमुळे अनेकांना त्रास होतो.
-
मात्र अनेकदा हे उपाय करुनही डास कमी होत नाही. त्यामुळे या डासांना पळवून लावण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करु शकता.
-
विशेष म्हणजे या उपायांमुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणामही होत नाही. तसेच तुमची डासांपासून काही प्रमाणात सुटकाही होऊ शकते.
-
कडुलिंबाचे तेल हे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असते. नारळाचे तेल आणि कडुलिंबाचे तेल यांचे मिश्रण डास पळवण्यासाठी फार फायदेशीर ठरते. या तेलाच्या मिश्रणाचा एक विशिष्ट वास येतो, ज्यामुळे डास पळून जातात.
-
घरातील डास पळवून लावण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे कापूर. तुमच्या घरात डास असतील तर दारं-खिडक्या बंद करुन कापूर जाळावा. कापूराच्या वासाने डास पळून जातात.
-
तुळशीचे रोप हे घरातील डास घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुमच्या घराच्या खिडकी किंवा दाराबाहेर एखादे तुळशीचे रोप लावा. यामुळे डास घरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते.
-
पुदिन्याच्या उग्र गंधामुळेही डास दूर पळतात. रात्री झोपण्याआधी हाता-पायांना १-२ पुदिन्याची पानं चोळावी. ज्यामुळे रात्रभर तुमच्याजवळ डास फिरकत नाही.
-
कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळा आणि त्यानंतर त्याचा दिवा लावा. यामुळे डास घरात शिरकाव करणार नाही.
-
लसूण पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी उकळल्यानंतर ते संपूर्ण घरात शिंपडा. लसूणाच्या तिखट वासामुळे डास घरात येत नाहीत. उलट घरातील डास बाहेर जातील.
-
कडुलिंबाचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरा. हा स्प्रेस तमालपत्रावर मारा आणि नंतर हे तमालपत्र जाळा. याच्या धुरामुळे डास घरातून पळून जातील.

लोकप्रिय मराठमोळी गायिका लवकरच होणार आई! लग्नानंतर तीन वर्षांनी दिली खुशखबर; शेअर केली खास पोस्ट