-
सर्वसामान्य व्यक्तींच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास खूप अशक्तपणा जाणवतो. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास त्या व्यक्तीला विविध आजार होऊ शकतात.
-
रक्ताची कमतरता निर्माण झालेले शरीर कोणत्याही आजारांचा सामना करु शकत नाही.
-
तुमच्या शरीरातही रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही या पदार्थांचे सेवन केल्यास ती नक्कीच भरुन निघू शकते.
-
शरीरात रक्तवाढीसाठी बीट हे फार उत्तम समजले जाते. नियमित बीटचे सेवन केल्यास रक्त वाढण्यास मदत होते.
-
सफरचंद किंवा डाळींब ही फळ खाल्ल्याने शरीरात रक्ताची वाढ होते. प्रत्येकाने एक ग्लास सफरचंदाचा रस प्यावा.
-
तसेच सफरचंद, बीट आणि गाजर याचा एकत्र ज्यूस प्यायल्याने तुम्हाला फायदा मिळतो.
-
शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या कडधान्याचे सेवन करावे.
-
खजूराचे सेवन केल्यानेही शरीरात रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
-
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते.
-
तसेच शरीरात रक्त वाढवण्यासाठी पालक, मेथी, लाल माठ, शेपू यासारख्या पालेभाज्या खा.

मी आंबेडकरी, ‘आरएसएस’च्या विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही…, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलताईंचे स्पष्टीकरण