-
आपल्या सर्वांच्या घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर. चमचमीत, स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासापासून ते रोजच्या जेवणापर्यंत सर्वच गोष्टी याच ठिकाणी बनवल्या जातात. मात्र स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात, जेणेकरुन तुमच्या कामाचा गोंधळ होणार नाही.
-
स्वयंपाकघरात एखादा पदार्थ शिजवताना तो मंद किंवा मध्यम आचेवर शिजवावा. कारण मंद किंवा मध्यम आचेवर पदार्थ चांगला शिजतो.
-
जर तुम्ही एखादी रस्सा असलेली भाजी केल्यास तिला तेल सुटायला लागल्यावर ती शिजली असे समजावे.
-
कोणताही पदार्थ तळताना तेलात थोडेसे तेल टाकावे. त्यामुळे तेल उडत नाही.
-
पास्ता, नुडल्स करतेवेळी उकळत्या पाण्यात थोडेसे तेल टाकावे. त्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाही. ते सुटसुटीत होतात.
-
कोणत्याही पालेभाज्या करण्यापूर्वी आधी धुवून घ्याव्यात. त्यानंतर त्या चिराव्यात.
-
अनेकदा स्वयंपाकघरात गॅसवर ठेवलेले दूध उतू जाते. त्यामुळे अशावेळी दूधाच्या भांड्यावर एक चमचा ठेवावा.
-
फोनवर बोलता बोलता किंवा फोन गॅसजवळ ठेवून जेवण करु नये.
-
हाताला सॅनिटायझर लावून गॅसजवळ जाऊ नये. सॅनिटायझरमध्ये अल्कहोल असल्याने ते लगेच पेट घेऊ शकते.
-
स्वयंपाकघरात ओटा, गॅस आणि फरशी पुसायचा कपडा वेगवेगळा ठेवावा.
-
स्वयंपाकघरात काम करतेवेळी लागणाऱ्या गोष्टी काढून ठेवा. त्यानंतर पसारा आवरुन ठेवावा.

“राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट होता, आम्ही…”; माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी काय सांगितलं?