-
२०१५ पासून दरवर्षी आपल्याकडे ७ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची सुरुवात केली. हातमाग व्यवसाय हा देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक आहे (फोटो: Indian Express)
-
पारंपरिक कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली तर प्राचीन परंपरा टिकवणं, नव्याने रुजवणं आणि जगभरात त्याच दिमाखात पोहोचवणं शक्य होतं हे गेल्या काही वर्षांत सातत्याने हातमाग व्यवसायासाठी केल्या गेलेल्या ठोस प्रयत्नांतून दिसून आलं आहे. (फोटो: Financial Express)
अर्चना जाजू यांचे लेबल हातमागाच्या क्लासिक साड्या आणि दुपट्ट्यांसाठी ओळखले जाते. अर्चनाचे लेबल २० वर्षांहून अधिक काळ वस्त्रोद्योगाचा एक भाग आहे. अर्चना तिच्या हाताने विणलेल्या कापडांसह आणि त्यावरच्या कलामकारी कामासाठी ओळखली जाते, हा एक पारंपरिक भारतीय कला प्रकार आहे ज्यात हाताने कापडावर रंग भारत कलाकुसर केली जाते. अर्चनाचा ब्रँड भारतातील १७ वेगवेगळ्या क्लस्टर्सच्या हातमागावरील कारागिरांसोबत काम करतो. (फोटो:@archnajaju.in/Instagram) -
अनाविला मिश्रा-फॅशन वर्तुळात साड्यांसाठी शुद्ध तागाचे धागे वापरणाऱ्या पहिल्या डिझायनरांपैकी एक म्हणून प्रसिद्ध डिझायनर अनविला मिश्रा या ओळखल्या जातात.
-
अनाविला यांच्या ब्रँडने हातमागावरच्या साड्यांमुळे फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. हाताने विणलेल्या कपड्यांसह प्रयोग करणे अनाविलाच खास वैशिष्ट्य आहे. (फोटो: @anavila_m/Instagram)
-
पश्चिम बंगाल, झारखंड आणि भुज सारख्या देशभरातील विविध शिल्प क्लस्टर्ससोबत अनाविला अतिशय जवळून काम करते.
-
पायल खांडवाला- पायलने सातत्याने पारंपारिक विणकर आणि हाताने विणलेल्या कापडांबरोबर काम केले आहे. (फोटो:@payalkhandwala/Instagram)
-
पायलच्या ब्रँडचे बनारस आणि पश्चिम बंगालमध्ये कायमस्वरुपी लूम आहेत. हे लूम हातमागावर विणलेले कापड तयार करण्यासाठी समर्पित आहेत.
-
पायलच्या ब्रँडचा कल कलात्मक कपडे तयार करण्याकडे आहे.
गौरांग शहा – गौरांग पारंपारिक जामदानी विणकाम केलेल्या कामासाठी सर्वात प्रसिद्ध आहेत. (फोटो:@gaurangofficial/Instagram) -
पारंपारिक कापडांना आधुनिक अवतार देण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यासारख्या पर्यावरणपूरक तंत्रांचा वापर करण्यावर गौरांगचा विश्वास आहे. (फोटो:@gaurangofficial/Instagram)
-
हातमागाच्या साड्यांवर पारशी, काश्मिरी, चिकनकारी, कच्छ यासारख्या हाताने भरतकाम करण्याच्या तंत्राचा गौरांग नव्याने शोध घेण्याचे काम करतो. (फोटो:@gaurangofficial/Instagram)
-
राहुल मिश्रा- राहुलच्या डिझाईन पारंपारिक विणकाम आणि बनारसी रेशीम, चिकनकारी आणि केरळच्या सूती हातमाग कापडांपासून बनवलेले असतात. (फोटो:@rahulmishra_7/Instagram)
-
राहुलच्या पहिल्या लॅक्मे फॅशन वीक शोमध्ये त्याने केरळ हातमाग कापडाचा वापर करत कलेक्शन बनवलं होत. राहुलने चंदेरी, समकालीन पोशाखांसाठी खादी आणि हाऊट कॉउचरसाठी इकत असे प्रयोग केले आहेत. (फोटो:@rahulmishra_7/Instagram)
-
आधुनिक, दैनंदिन पोशाख तयार करण्यासाठी हातमाग कापड वापरणे ही राहुलची दृष्टी आहे. (फोटो:@rahulmishra_7/Instagram)
-
रितु कुमार – फॅशन वर्तुळात रितु कुमार हे नावं खूप मोठ आहे. जवळपास ४५ वर्षांपासून त्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. (फोटो:@ritukumarhq/Instagram)
-
भारताच्या हातमागांना पुनरुज्जीवित करण्यामागेही रितु अग्रणी आहेत. त्यांनी हँडब्लॉक प्रिंटिंग, तसेच रेशीम आणि हाताने विणलेल्या भागलपूर कपड्यांवर आणि साड्यांसाठी काम केले आहे. (फोटो:@ritukumarhq/Instagram)
-
रितुचे पुनरुज्जीवनवादी आणि वाराणसी वीव्ह सारखे कलेक्शन भारतीय कापडांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्दिष्टाने बनवलेली आहेत. (फोटो:@ritukumarhq/Instagram)

“राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट होता, आम्ही…”; माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी काय सांगितलं?