-
केस गळती रोखण्यापासून ते केसांच्या वाढीसाठी प्रत्येक घराघरात वापरण्यात येणारे तेल म्हणजे खोबरले तेल. खोबरेल तेलाने केसांना मालिश केल्यास त्याचा निश्चित फायदा होतो असे म्हटलं जाते.
-
काही ठिकाणी जेवण तयार करण्यापासून ते औषधांपर्यंत खोबरेल तेलाचा वापर होतो. पण या व्यतिरिक्तही खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत, ज्याचा तुम्हाला दैनंदिन आयुष्यात नक्की फायदा होऊ शकतो.
-
मेकअप रिमूव्हर – खोबरेल तेल हे उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते.
-
मेकअप काढण्यासाठी आपण बऱ्याचदा बाजारात मिळणारे वेगवेगळे रसायनयुक्त रिमूव्हर विकत घेतो. पण त्याऐवजी खोबरेल तेलाने मेकअप काढला तर त्वचेला कोणताही त्रास होत नाही.
-
खोबरेल तेलाने एखाद्या जखमेवरील दाह कमी होतो. जर तुम्हाला चटका लागला तर भाजलेल्या ठिकाणी खोबरेल तेल लावावे. त्यामुळे जळजळ कमी होते.
-
खोबरेल तेल कोणत्याही प्रकाराच्या त्वचेसाठी चांगले असते.
-
हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम होते.
-
डोळ्याखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्याखाली सुरकुत्या पडत नाही. तसेच डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळेही निघून जातात.
-
चेहऱ्यावर पुरळ येत असलीत तर खोबरेल तेलाचा वापर करा. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.
-
खोबरेल तेलाने चेहरा उजळण्यास मदत होते. यासाठी खोबरेल तेल आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे फेसपॅक तयार करावे. हे फेसपॅक चेहऱ्याला लावावे. या नैसर्गिक फेसपॅकमुळे चेहरा उजळतो.
-
जर अंगावर लाल चट्टे किंवा खाज येत असेल तर खोबरेल तेलाच्या वापरामुळे आराम मिळतो.
-
खोबरेल तेल मिश्रित गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो.
-
खोबरेल तेलात थोडे साखराचे दाणे टाकून ते मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हे एक उत्तम स्क्रबर असून त्यामुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.
-
आपण सतत केसांवर केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनर यासारखे उत्पादन लावत असतो. त्यामुळे केसांचे आरोग्य बिघडून केसगळतीचे प्रमाण वाढते.
-
जर तुम्हालाही ही समस्या असेल तर आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने केसांना मसाज करावा. यामुळे केसगळतीचे प्रमाण कमी होते. तसेच कोंड्याची समस्या देखील दूर होते.

Pm Modi : थलपती विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३८ जणांचा मृत्यू, मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय रॅली…”