-
हल्ली तरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण सर्रास जीन्सचा वापर करताना दिसतात. हल्ली अगदी लग्नकार्यापासून फिरायला जाण्यापर्यंत सर्व प्रसंगी जीन्सचा वापर केला जातो.
-
सध्या जीन्सचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. पण जीन्स सतत धुतल्याने ती खराब होऊ शकते. जीन्सचा रंग ही दिवसेंदिवस कमी होत जातो.
-
त्यामुळे जर तुम्ही जीन्सची योग्य काळजी घेतली नाही, तर काही काळानंतर जीन्स जुनी दिसू लागते.
-
जर तुम्हालाही तुमची जीन्स सतत नवीन दिसावी असे वाटत असेल, तर तुम्ही काही ठराविक गोष्टींची काळजी घेऊन ती टिकवू शकता.
-
जर तुमच्या जीन्सवर एखादा डाग लागला असेल तर तो घालवण्यासाठी ब्लीच वापर करु नये. ब्लीच वापरल्याने जीन्सचा रंग धुतल्यानंतर फिकट होतो. त्यामुळे तुमची जीन्स जुनी वाटते.
-
जीन्सवर लागलेले डाग काढण्यासाठी एखाद्या लिक्विड डिटर्जंट वापरु शकता. त्यामुळे जीन्सला कोणतेही नुकसान होत नाही.
-
अनेक महिला एकदा जीन्स वापरल्यानंतर लगेच ती धुवायला टाकतात. पण त्यामुळे तुमच्या जीन्सचा रंग फिकट होतो. यामुळे शक्यतो जीन्स धुणे टाळा.
-
जीन्स धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा.
-
तसेच वॉशिंग मशीनमध्ये जीन्स धुतेवेळी ती उलटी करुन धुवा. यामुळे जीन्सचा बाहेरचा भाग खराब होत नाही.
-
जीन्स धुतल्यानंतर ती ड्रायरमध्ये वाळण्यासाठी ठेवणे टाळा. जर ड्रायरचा वापर करत असाल तर त्याचा स्पीड हा कमी ठेवा.
-
जीन्स धुतल्यानंतर तिला हवेवर वाळण्यासाठी ठेवून द्या.
-
परंतु जीन्स उन्हात वाळवू नका. त्यामुळे त्याचा रंग लवकर फिकट दिसू लागतो.
-
जीन्स धुताना व्हिनेगर व मीठ टाकलेल्या पाण्याने धुवावे. यामुळे त्याचा रंग जात नाही.
-
जीन्स धुण्याआधी त्याच्या मागील बाजूला दिलेल्या सूचना नक्की वाचा.
-
परदेशात राहणाऱ्या अनेक व्यक्ती जीन्स ही सहा महिन्यातून एकदा धुतात. त्यामुळे त्यांच्या जीन्स बऱ्याच दिवस टिकतात.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली