-
केसांची गळती ही आता सर्वसामान्य समस्या आहे. केस गळण्यामागे अनेक कारणे असतात. केसांची वाढ कमी होणे, हार्मोन्समध्ये बदल, योग्य आहारांचा अभाव, विविध शॅम्पू-तेल यांचा वापर यामुळे केस गळती वाढू शकते.
-
केस गळतीच्या समस्येवर योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर ही समस्या वाढू शकते. तुम्हालाही केस गळतीपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.
-
केस गळती रोखण्यासाठी प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ खा. नेहमीच्या आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ, मासे, पनीर यासारखे पदार्थांचा समावेश करा.
-
केस धुतल्यानंतर ते ओले असताना बांधू नका किंवा ते लवकर वाळावे यासाठी टॉवेलने रगडू नका. त्यामुळे ते कमजोर होऊ शकतात.
-
केसांना कोमट तेलाने मसाज करा. मसाज करतेवेळी हाताच्या बोटांनी डोक्याच्या पृष्ठभागावर मसाज करा.
-
जर तुमचे केस पातळ असतील, तर त्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करा.
-
जर केस गळती वाढली असेल तर त्याला कांद्याचा रस लावावा. अर्धा तासानंतर केस धुवा. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते
-
केसात कोंढा झाल्यामुळेही केस गळती सुरु होते. कोंढा घालवण्यासाठी दही लावा.
-
आठवड्यातून एकदा केस धुवावेत. केस अस्वच्छ असल्यावर ते जास्त प्रमाणात गळतात.
-
केसांमधून सतत हात फिरवू नका.
-
तुमचा केस विंचारण्याचा कंगवा वेगळा ठेवा.
-
केस धुतेवेळी जास्त गरम पाण्याचा वापर करु नका.
-
केस गळतीची समस्या जास्त प्रमाणात असेल तर विविध उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा डॉक्टरांचा आवश्यक सल्ला घ्या.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादलं आणि पाकिस्तानला गोंजारलं; तेल आयातीसंदर्भात करार!