-
करोना काळात अनेकजण आरोग्यप्रती जागरुक झाले आहेत. करोनामुळे अनेकांचे राहणीमान बदलले आहे.
वर्क फ्रॉम होम, तासनतास एकाच स्थितीत बसून काम करणे, खाणे-पिणे टाळणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढला आहे. -
विशेष म्हणजे ६५ टक्के तरुण हे वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. यातील अनेक जण हे वजन कमी करण्यासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियावर उपाय शोधत असतात.
-
तर काहीजण दिवसातील बरेच तास वजन कमी करण्यासाठी मेहनत करतात. पण यादरम्यान काही जण चुका करतात, ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढू शकते.
-
पुरेसे अन्न न खाणे: आपल्यातील अनेक जण वजन कमी करण्यासाठी अन्न कमी करण्याऐवजी ते खाणं बंद करतात. पण ही तुमची सर्वात मोठी चूक ठरु शकते.
-
तुम्ही पुरेसे अन्न न खाल्ल्याने तुमच्या शरीराच्या काम करण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढू शकते.
-
बऱ्याचदा काही आहारतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी आहारात काही विशिष्ट खाद्यपदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. यामुळे अनेक जण वजन कमी करण्यासाठी चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे टाळतात.
-
मात्र हे चुकीचे ठरते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाच्या आहारात सर्व पोषक घटक असलेले अन्न काही प्रमाणात असणे आवश्यक आहे.
-
झोपेचा अभाव: वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत झोपेची भूमिका फार महत्त्वाची आहे. ज्या लोकांना दररोज 6 ते 8 तास झोप मिळत नाही, त्यांना वजन कमी करतेवेळी अडचणींचा सामना करावा लागतो.
-
जे लोक फार कमी झोपतात, त्यांचे मेटाबॉलिझम कमी होते. ज्यामुळे त्यांचे वजन कमी होत नाही.
-
शारीरिक निष्क्रियता: बराच वेळ एकाच स्थितीत बसणे आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकते. जेव्हा तुम्ही सतत न हलता काम करता, त्यावेळी शरीरात लिपेस नावाचे हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया थांबते. यामुळे लोकांचे वजन वाढू शकते.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक