-
हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अपुऱ्या झोपेमुळे अनेक त्रासाचा सामना करावा लागतो. यात सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे.
-
तासनतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करणे, त्यानंतर स्मार्टफोन, टीव्हीसमोर बराच वेळ घालवणे, चहा-कॉफीचे अतिसेवन यासारख्या असंख्य कारणामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात.
-
डोळ्यावर काळी वर्तुळ घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. मात्र काही घरगुती उपाय करुन तुम्ही ही काळी वर्तुळे दूर करु शकता.
-
टोमॅटो आणि लिंबू – टोमॅटोमुळे डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतात. टोमॅटोमुळे तुमची त्वचाही सुधारते. एक वाटीत चमचाभर टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस मिक्स करा. हा लेप डोळ्यांच्या खाली लावा. त्यामुळे काही दिवसात काळी वर्तुळे कमी होतील.
-
बटाटा – बटाटा किसून त्याचा रस डोळ्यांच्या खाली काळ्या वर्तुळाभोवती लावावा. जर रस लावणं शक्य नसेल तर बटाटाच्या कापून त्याच्या चकत्या डोळ्यांवर ठेव्याव्यात. दहा मिनिटांनी चेहरा आणि डोळे गार पाण्याने धुवावा.
-
काकडी – बटाट्यासोबतच काकडीच्या चकत्याही डोळ्यांवर ठेवाव्यात. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. तसेच यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे कमी होतात.
-
खोबरेल तेल आणि बदामाचे तेल एकत्र करुन डोळ्याखाली असलेल्या काळ्या वर्तुळांवर हलक्या हाताने मसाज करा. एक तासभर ठेवल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
-
टी-बॅग – टी बॅग वापरल्यानंतर चहा पावडरचा चोथा फेकून न देता तो फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर त्या थंड टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवा. याचा खूप चांगला परिणाम होतो. यामुळे काळी वर्तुळ निघून जातात.
-
थंड दूध – एका प्लेटमध्ये थंड दूध घ्या. त्या दुधात कापूस बुडवून डोळ्यांखाली ठेवा. त्यानतंर १० मिनिटांनी तो कापूस काढून डोळे साध्या पाण्याने धुवून घ्या.
-
गुलाबपाणी – गुलाब पाण्यात कापूस भिजवून काळ्या वर्तुळांवर ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवा. महिनाभर ही प्रक्रिया केल्याने तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…