-
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण योगा, जिम, फिटनेस सेंटरमध्ये तासनतास घालवतात.
-
सध्या फिटनेससाठी व्यायाम महत्त्वाचा असला, तरी त्याचे थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतात. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर त्वचेची काळजी घेणं आवश्यक असतं.
-
व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावरचा मेकअप काढा. चेहऱ्यावर मेकअप असताना तुम्ही व्यायाम केलात तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स होण्याचा धोका असतो.
-
मेकअपमुळे रॅशेस, ब्लॅकहेड आणि व्हाईटहेड्स देखील होऊ शकतात.
-
व्यायाम करण्यापूर्वी तुमचा चेहरा क्लीन्झरने धुवा.
व्यायामादरम्यान खूप घाम येत असेल तर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा किंवा सनस्क्रीनयुक्त मॉइश्चरायझर लावावे. -
व्यायाम झाल्यानंतर सर्वात आधी हात स्वच्छ धुवून घ्या.
-
जर शक्य असेल तर व्यायाम केल्यानंतर अंघोळ करा आणि त्वरित घामाचे कपडे बदला.
-
हेवी वर्कआउट केल्यानंतर भरपूर घाम येतो. त्यामुळे व्यायाम झाल्यानंतर थोडावेळ आराम करुन हळहळू पाणी प्या.
-
व्यायाम झाल्यानंतरही त्वचेवर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरु नका.

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”