-
आरामदायी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खराब आहार यामुळे आता अनेक लोक लठ्ठ होत आहेत.
-
त्यासोबतच वर्क फ्रॉम होम, तासनतास एकाच स्थितीत बसून काम करणे, खाणे-पिणे टाळणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढला आहे.
-
विशेष म्हणजे ६५ टक्के तरुण हे वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत.
-
यातील अनेक जण हे वजन कमी करण्यासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियावर उपाय शोधत असतात.
-
तज्ज्ञांच्या मते, तुमचा आहार हा लठ्ठपणा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो.
-
लठ्ठपणा किंवा विशेषत: पोटाची चरबी कमी करणे हे खूप कठीण काम असते.
-
लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाब आणि संधिवात यासारखे अनेक गंभीर आजार होतात.
-
पण व्यायामाबरोबरच तुमच्या आहारात बदल करून तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता.
-
पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळची न्याहारी किंवा नाश्ता.
जर तुम्ही सकाळच्या नाश्तामध्ये या गोष्टींचे सेवन करत असाल तर तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. -
आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दररोज सकाळी नाश्त्यामध्ये तेल, मसाले किंवा तूप असलेले पदार्थ टाळावेत.
-
तसेच ज्यांना पोटावरील चरबी कमी करायची आहे त्यांनी नाश्त्यावेळी वेफर्स, पॉपकॉर्न किंवा ड्रायफ्रूट्स यासारख्या वस्तूंचे सेवन करु नये.
आपल्यातील अनेक जण ऑफिसला जातेवेळी सकाळी नूडल्स किंवा मॅगी खातात. मात्र हा नाश्ता शरीरासाठी निरोगी मानला जात नाही. -
जे लोक लठ्ठ आहेत, त्यांनी नाश्त्यामध्ये फळांचा रस घेऊ नये. फळांच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो.
-
सकाळी नाश्त्यात समोसे, वडा किंवा कचोरी यासारखे तळलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे तुमच्या पोटावरील चरबी वाढू शकते.
-
केक किंवा चॉकलेट यासारखे गोड पदार्थामुळे पोटावरील चरबी वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर नाश्त्यामध्ये केक, चॉकलेट किंवा कुकीज यासारख्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”