-
आपल्या आयुष्यात एखादा खास मित्र किंवा मैत्रिणी नेहमीच असतात. त्याला किंवा तिला भेटण्यासाठी आपण प्रचंड उत्सुक असतो.

जर तुम्ही त्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटत असाल तर मग तुमच्या मनात फक्त वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले असतात. -
कोणते कपडे घालायचे? त्यावर मॅचिंग ज्वेलरी आहे का? चेहरा नीट दिसतोय का? यासारखे एक ना हजार प्रश्न आपल्याला पडलेले असतात.
-
पण एखादा पुरुष जेव्हा एखाद्या महिलेला पहिल्यांदा भेटतो तेव्हा तो नेमकं काय पाहतो? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
-
प्रत्येक तरुणी ही तरुणाला भेटायला जाताना त्याच्यातील काही विशिष्ट गुण पाहते. त्याचप्रमाणे एखादा पुरुषही महिलेला भेटायला जाताना तिच्यात काही ठराविक गुण आहेत का? याची चाचपणी करत असतो.
-
एखादा पुरुष जर त्या महिलेला पहिल्यांदाच भेटत असेल तर तो तिचं हसण कसं आहे यावर लक्ष देतो. तिचे दात व्यवस्थित आहेत का? तिच्या तोंडातून काही वास येत नाही ना? याचीही तो पडताळणी करतो. विशेष म्हणजे फक्त पुरुष नाही तर महिलाही यावर लक्ष देतात.
-
एखादी महिला भेटायला येताना नेमके कोणते कपडे परिधान केले आहेत? तिने ओव्हर मेकअप केलाय का? याकडेही पुरुषही फार लक्ष देतात.
-
एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटायला गेल्यावर सहाजिकच आपल्या मनात थोडीशी धाकधूक असते. पण असं असलं तरी ती तरुणी समोरुन बोलते का? तिला नेमकं काय आवडतं? याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तरुणांना असते.

अनेकदा पुरुष महिलांच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेतात. तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता, याचाही अनेक पुरुष विचार करतात. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार त्याला काय विचारता, हे तो कायमस्वरुपी लक्षात ठेवतो. -
हे सर्व गुण बघितल्यानंतर ती तरुणी माझ्यासाठी योग्य आहे की नाही? याची तो स्वत:च चाचपणी करतो.
संकष्टी चतुर्थीला १२ राशी होणार संकटमुक्त; पदरी पडेल कल्पनेपलीकडील यश-लाभ; वाचा तुमचे राशिभविष्य