-
उन्हाळी हंगाम सुरू झाला असून कडक उन्हासोबत गरम हवा वाहू लागते. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. (फोटो: indian express)
-
उन्हाळ्यात पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते, यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे घाम येत राहतो आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते. ( फोटो: indian express)
-
उष्माघात टाळण्यासाठी बेल सिरप खूप फायदेशीर ठरू शकते. हे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते.(फोटो: jansatta)
-
पाण्यात लिंबू आणि मीठ घालून दिवसातून २- ३ वेळा प्या. यामुळे उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. (फोटो: file photo)
-
उन्हात बाहेर जाणे टाळा. आवश्यक असल्यास, आपले डोके झाकून घ्या आणि सनग्लासेस घाला. उन्हाळ्यात हलक्या रंगाचे कपडे घालणे खूप आरामदायक असते. (फोटो: indian express)
-
कोथिंबीर किंवा पुदिन्याच्या पानांचा रस काढून त्यात चिमूटभर साखर टाकून पिणे हा शरीरातील उष्णता कमी करण्याचा सोपा घरगुती उपाय आहे. आयुर्वेदानुसार या औषधी वनस्पती शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. (फोटो: indian express)
-
उन्हाळयात नारळाचे पाणी तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे नैसर्गिक संतुलन राखून तुमचे शरीर निरोगी ठेवते. (फोटो: indian express)
-
आंब्याचे पन्हे हे उन्हाळ्यासाठी अतिशय आरोग्यदायी पेय आहे. यासाठी कच्चे आंबे मंद आचेवर भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर त्याचा लगदा बाहेर काढा आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. नंतर त्यात काळी मिरी आणि मीठ घालून सर्व्ह करा. ( फोटो: jansatta)
-
उष्माघाताचा अधिक त्रास झाल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा जेणेकरून ते वेळेत योग्य उपचार घेऊ शकतील. (फोटो: indian express)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा