-
भेगा पडलेल्या टाचांमुळे पायाचे सौंदर्य कमी होते. हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या लोकांना भेडसावत असली तरी काहीजणांच्या वर्षभर टाचांना भेगा पडतात. (photo: file photo)
-
टाचांना भेगा पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाय स्वच्छ न करणे, कोरडी त्वचा, हार्मोनल असंतुलन आणि विशिष्ट जीवनसत्त्वांचा अभाव. (photo: file photo)
-
तुम्हालाही टाचांच्या भेगा पडल्याचा त्रास होत असेल तर सर्वप्रथम अनवाणी चालणे बंद करा. (photo: pexels)
-
भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी काही खास उपायांचा अवलंब करून तुम्ही लवकरच भेगा पडलेल्या टाचांवर उपचार करू शकता. (photo: pexels)
-
जर तुम्हाला भेगा पडलेल्या टाचांचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यात बुडवून स्वच्छ करा. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात सैंधव मीठ, शॅम्पू आणि डेटॉल मिसळा आणि त्यात पाय १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवा. (photo: indian express)
-
१५ मिनिटांनंतर, कोणत्याही ब्रशने पायांची टाच चांगले घासून घ्या. आता पाय पाण्यातून काढून त्यावर स्क्रब लावून मसाज करा. (photo: pexels)
-
२० मिनिटांनंतर पायांवर फूट केअर क्रीम लावा आणि पायात मोजे घाला. या उपचाराचा परिणाम तुमच्या पायावर स्पष्टपणे दिसून येईल. (photo pixabay)
-
तुमच्या टाचांना नेहमी भेगा पडत असतील तर सर्वप्रथम त्यांना रोज स्वच्छ करण्याची सवय लावा. टाचा स्वच्छ करण्यासाठी त्यांना स्क्रबरने घासावे म्हणजे पायावरील सर्व घाण बाहेर पडेल.(photo : file photo)
-
टाचांना भेगा पडल्याचा त्रास होत असेल तर पाय स्वच्छ करून त्यावर तेल लावा. खोबरेल तेलाने टाचांची मालिश करू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी तेलाने मसाज केल्याने टाचांच्या भेगा दूर होतात. (photo: pexels)
-
टाचांना मॉइश्चरायझ करण्यासाठी तुम्ही हील्स क्रीम देखील लावू शकता. पायावर हील्स क्रीम लावून त्यावर सिलिकॉन शूज घातल्याने टाच मऊ आणि गुळगुळीत राहतील. (photo: pixabay)
-
जर तुम्हाला टाचांना भेगा पडल्याचा त्रास होत असेल तर आहारात व्हिटॅमिन बी३, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईचा समावेश करा. व्हिटॅमिन ई पायाच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करेल. (photo: file photo)
-
व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात काजू आणि बियांचे सेवन करावे. व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी आंबट पदार्थ खा.(photo: jansatta)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग