-
प्रत्येकाला माहित आहे की कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन नेहमीच समस्या निर्माण करते. तीच स्थिती कांद्याची आहे.
-
जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर रक्तातील साखर वाढून पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते.
-
चला तर मग जाणून घेऊया कांद्याच्या अतिसेवनाने इतर कोणते तोटे होऊ शकतात.
-
अॅसिडिटीची समस्या जाणवू शकते : कांद्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज जास्त असते.
-
याशिवाय यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, जे काहींना चांगले पचत नाही. अशा स्थितीत अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
-
मधुमेहाच्या रुग्णांना धोका : कच्चा कांदा रक्तातील साखरेसाठीही फायदेशीर नाही.
-
मधुमेहाच्या रुग्णांना कोणतीही गोष्ट जपून खावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा स्थितीत कच्चा कांदा खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
-
छातीत जळजळ : जर तुम्हीही कच्चा कांदा मोठ्या प्रमाणात खात असाल तर काळजी घ्या.
-
कारण यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. म्हणूनच कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाणे टाळा.
-
तोंडातून वास येऊ शकतो : यासोबतच तोंडातून दुर्गंधी येण्याची तक्रारही तुम्हाला जाणवू शकते.
-
कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत जास्त कांदा न खाण्याचा प्रयत्न करा.
-
जरी तुम्ही कांदा खाल्ला, तरी नंतर पाण्याने नीट चूळ भरा.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?