-
आजकाल प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. यासाठी लोक विविध प्रकारची उत्पादने वापरतात.
-
मात्र, बाजारात आलेली उत्पादने जास्त काळ वापरल्याने चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो.
-
तज्ज्ञांच्या मते, चमकदार त्वचा मिळविण्यासाठी खाण्यापिण्याकडे आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. अधिकाधिक फळे आणि भाज्या खा.
-
दररोज सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होईपर्यंत उठावे. यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. सकाळी योगासने आणि व्यायाम करा.
-
या नियमांचे पालन करून तुम्ही निरोगी राहू शकता. तसेच, चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने चमक आणण्यासाठी रोज सकाळी हे रस प्या.
-
लिंबूपाणी सेवन केल्याने चेहऱ्यावर अतिरिक्त चमक येते. तज्ज्ञांच्या मते, रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे चेहऱ्यावर ताजेपणा राहतो.
-
लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते, जे त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवण्यास मदत करते.
-
नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्यावर चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही दररोज बीटचा रस घेऊ शकता. यामध्ये लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते.
-
बीटच्या सेवनाने रक्त शुद्ध होते, ज्यामुळे त्वचेतील सर्व समस्या दूर होतात.
-
एका संशोधनानुसार, बीटच्या अर्कामध्ये ग्लायकोसिल सिलारामाइड आढळते. हे त्वचेच्या वरच्या थराचे संरक्षण करते. यासोबतच चेहऱ्याशी संबंधित इतर समस्यांवरही हे फायदेशीर आहे.
-
टोमॅटोमध्ये पाणी मुबलक प्रमाणात आढळते. जास्त पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. यासोबतच शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात.
-
टोमॅटोमध्ये लाइकोपीन आढळते, जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी रोज सकाळी टोमॅटोचा रस घ्या. (all photo: pexels)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या