-
नामिबियातील ८ चित्त्यांना १७ सप्टेंबर रोजी विशेष बंदोबस्तात भारतात आणण्यात आले. (Photo : AP)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले. (Photo : ANI)
-
भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना तब्बल ७० वर्षांनंतर पुन्हा भारतात आणण्यात आले. (Photo : ANI)
-
याच पार्श्वभूमीवर बिबट्या आणि चित्त्यांमध्ये नेमका फरक काय आहे? असा प्रश्न लोकांना पडला आहे. (Photo : Pexels)
-
दोन्ही प्राणी दिसायला सारखेच दिसतात. आज आपण या दोघांमधील फरक समजून घेऊया.
-
चित्ताचे खांदे बिबट्यांपेक्षा लांब असतात. ते बिबट्यांपेक्षा उंच दिसतात. चित्त्याचे सरासरी वजन ७२ किलो असते. चित्ता जास्तीत जास्त १२० किमी प्रतितास वेगाने धावू शकतो.
-
त्याच वेळी, मांजरीच्या प्रजातीतील बिबट्या हा लहान प्राणी असला तरीही ते चित्तापेक्षा जड आणि मजबूत असतात. बिबट्याचे वजन १०० किलो पर्यंत असते. चित्तापेक्षा बिबट्या जास्त मांसल असतो.
-
बिबट्या भक्ष्यावर हल्ला करण्यासाठी आणि पकडण्यासाठी प्रचंड शक्ती वापरतात. बिबट्या त्यांचे भक्ष्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला झाडावर घेऊन जातात.
-
चित्ता आणि बिबट्याच्या पंजेमध्येही फरक आहे. चित्ताचे पंजे वेगाने धावण्यासाठी अनुकूल असतात. चित्त्याचे पंजे आकुंचन पावत नाहीत कारण त्यांना धावताना वेगाने हलवावे लागते.
-
चित्त्याचे मागचे पाय पुढच्या पायांपेक्षा मोठे आणि मजबूत असतात त्यामुळे ते वेगाने धावू शकतात.
-
दुसरीकडे, बिबट्याचे पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा मोठे असतात. यामुळे, ते सहजपणे शिकार ओढून झाडावर नेतात.
-
भक्ष्याला पंजा मारतानाही त्यांचे मोठे पाय उपयोगी पडतात.
-
चित्ता आणि बिबट्याच्या कातडीतही फरक आहे. चित्ताची त्वचा हलकी पिवळी आणि पांढर्या रंगाची असते.
-
त्यावर गोल किंवा अंडाकृती काळे डाग असतात.
-
तर बिबट्याची त्वचा पिवळ्या रंगाची असते आणि त्याच्या त्वचेवरील डागांचा आकार निश्चित नसतो. (All Photos : Pexels)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक