-
तुळसीच्या बिया वजन नियंत्रित राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे ते सुपरफूड बनते. या बियांचे सेवन केल्याने तुमचे वजन प्रभावीपणे कमी होऊ शकते.
-
उन्हाळयाच्या दिवसात या बिया आपल्या पेयांमध्ये घालून याचे सेवन करणे हा शरीराला थंडठेवण्यासाठीचा उत्तम उपाय आहे.
-
कडक उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी तुळशीच्या बिया उपयुक्त असण्यासोबतच त्यांच्यामुळे विषाणूजन्य, सर्दी आणि तापासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
-
तुळशीच्या बियांचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या आणि पोट फुगण्यापासून आराम मिळतो.
-
तुळशीच्या बियांमध्ये अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात जे कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यास आणि तणावग्रस्त स्नायूंना आराम देण्यास मदत करतात.
-
तुळशीच्या बियांमध्ये असलेले डाएटरी फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
-
तुळशीच्या बिया शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करतात आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देतात.
-
जतुळशीच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देतात.
-
तुळशीच्या बिया नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्स करतात आणि शौचाला मदत करतात.
(फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला