-
Shani Grah Margi 2022: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या वेळी आपले स्थान बदलून विविध राशींमध्ये प्रस्थान करतो, याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो.
-
यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच २३ ऑक्टोबरला शनी ग्रह मार्गी होणार आहे, याचा लाभ काही विशिष्ट राशींना होऊ शकतो.
-
ज्योतिष शास्त्रानुसार अशा तीन राशी आहेत ज्यांना शनीच्या मार्गक्रमणाचा मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
-
मेष रास: धनत्रयोदशीपासून आपल्या भाग्योदयाला सुरुवात होऊ शकते. शनीचे गोचर होताच कुंडलीत शनी दहाव्या स्थानी विराजमान होणार आहे.
-
शनिच्या मार्गक्रमणाने करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नही वाढू शकते.
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीचा उत्तम काळ हा धनत्रयोदशीपासून सुरु होत आहे.
-
धनु राशि: ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव दुसऱ्या भावात असतील.
-
शनिच्या मार्गक्रमणाने धन व वाणीशी संबंधित लाभाची चिन्हे आहेत. जर आपले करिअर शिक्षण किंवा मीडिया क्षेत्राशी संबंधित असेल तर बोलण्याने अनेक कामे मार्गी लागू शकतात.
-
धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे धनु राशीच्या व्यक्तींसाठी शुभ ठरू शकते
-
मीन राशि: शनिच्या मार्गक्रमणाने आता शनि तुमच्या कुंडलीत ११ व्या स्थानी विराजमान असणार आहे. यामुळे मिळकत वाढण्याची शक्यता आहे.
-
केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक तणावापासून सुद्धा काही प्रमाणात विश्रांती मिळू शकते.
-
तुमच्या जोडीदारासह नाते संबंध सुधारण्यास धनत्रयोदशी पासूनचा काळ लाभदायक ठरू शकतो.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत