-
ज्योतिष शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा कोणत्या ना कोणत्या राशीवर साडेसातीचा प्रभाव पडतो किंवा एखाद्या राशीवरील साडेसाती संपते.
-
१७ जानेवारी २०२३ ला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. यानंतर काही राशींची साडेसाती सुरु होणार आहे.
-
या राशी कोणत्या आहेत आणि त्यांनी काय खबरदारी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.
-
ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाला कर्मानुसार फळ देणारे देव मानले जाते.
-
त्याचबरोबर ते वय, दुःख, आजार, वेदना, विज्ञान प्रगती, इत्यादींचे कारकही मानले जातात.
-
मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि असून तूळ राशीत शनिदेव श्रेष्ठ मानले जातात तर मेष ही त्यांची दुर्बल राशी आहे.
-
तुमच्या कुंडलीत शनि कोणत्या घरामध्ये स्थित आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार साडेसातीचे फळ मिळते.
-
वैदिक ज्योतिषानुसार १७ जानेवारी २०२३ ला शनिदेव कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार असून यामुळे काही राशींच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
-
यामध्ये मकर, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांचा समावेश असू शकतो.
-
या काळात व्यापारामध्ये नुकसान होऊ शकते. तसेच, सुरळीत चाललेले कामही बिघडू शकते. ऑफिसच्या ठिकाणी बॉस किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची संभावना आहे.
-
त्याचबरोबर या दिवसांमध्ये या राशींच्या लोकांना आपल्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल