-
मेथीच्या बियांमध्ये ट्रायोनिललाइन आणि अल्कोलाइट असते, जे कार्बोदकांचे पचन आणि त्यांच्या शोषणाची प्रक्रिया मंद करते. मेथीच्या बिया बारीक करून त्याचे पावडर बनवा. रोज सकाळी एक चमचा हे पावडर खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. (source – indian express)
-
हळद : आयुर्वेदानुसार हळद हे अत्यंत शक्तिशाली आणि उपयुक्त औषधी आहे. (source – freepik)
-
हळद साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. जलद परिणामांसाठी हळद आणि आवळा एकत्र घ्या. (source – pixabay)
-
गुडमार : गुडमारच्या सेवनाने शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढते आणि साखरेचे प्रमाण कमी होण्यात मदत होते. गुडमार वजन आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील मदत करते. गुडमारची पाने चघळा किंवा ४०० मिलीग्राम पावडरने चहा बनवून प्या. (source – social media/jansatta)
-
जांभूळ : जांभळातील बियांमध्ये ग्लाइकोसाइड असते जे साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. जांभूळ अतिरिक्त साखरेला उर्जेत रुपांतर करते. जांभळाच्या बिया बारिक करून ताकासोबत ४६ ग्राम दिवसातून दोनदा घ्यावे (source – pixabay )
-
कडुलिंबाचा वापर : आयुर्वेदानुसार कडुलिंब खूप फायदेशीर आहे. कफ दोष संतुलित करण्याबरोबरच कडुलिंब इन्सुलिनवरील अवलंबित्व कमी करते. कडुलिंब रक्तप्रवाह सामान्य करते आणि साखरेचे प्रमाण कमी करण्यातही मदत करते. ४५ पाणांचे नियमित सेवन किंवा ज्यूसमध्ये मसळून प्या. (source – indian express)
-
त्रिफळा: त्रिफळा हे अतिशय उपयुक्त औषध आहे. ते स्वादुपिंडाच्या कार्यात मदत करून शरीराला इन्सुलिन तयार करण्यास मदत करते. गरम पाण्यात एक चम्मक त्रिफळा पावडर टाकून त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढणार नाही. (source – social media)
-
बेलपान हे मधुमेहात फायदेशीर ठरू शकते. बेलाची पाने बारीक करून त्यांचे रस काढा. २० मिलीलीटर रसात काळी मिरी आणि चवीनुसार मीठ मिसळून प्या. याने साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. (source – जनसत्ता)
-
कारले : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही नियमित कारल्याचे रस पिले पाहिजे. याने तुम्हाला वारंवार लघ्वी येणार नाही. कारल्यात चारेंटाईन नावाचे तत्व असते जे साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. कारल्याच्या बिया वेगळ्या करून त्याचे पावडर करून देखील वापर करता येऊ शकतो. (source – लोकसत्ता संग्रहित)

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी पत्रकार परिषद दोन मिनिटांत गुंडाळली, पोलीस म्हणाले…