-
२०२३ मध्ये अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. यामध्ये राहू आणि केतू ग्रहांचाही समावेश आहे. या दोन ग्रहांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी १८ वर्षांचा कालावधी लागतो. या ग्रहांना ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह असेही म्हणतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, केतू ग्रह २०२३ मध्ये कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव सर्वच राशींवर पाहायला मिळेल. मात्र केतूचे राशी परिवर्तन तीन राशींच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर सिद्ध होऊ शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
-
सिंह राशीच्या लोकांसाठी केतू ग्रहाचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. केतू ग्रह सिंह राशीच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. यामुळे या लोकांना व्यवसाय आणि व्यापारात धनलाभ होण्याची शक्यता आहे.
-
त्याचवेळी अडकलेले पैसे याकाळात परत मिळू शकतात. ज्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही वेळ अतिशय अनुकूल आहे. करिअरच्या बाबतीतही ही वेळ शुभ ठरू शकते. तसेच, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
-
केतू ग्रहाचे राशी परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या सातव्या घरात या ग्रहाचे संक्रमण होणार असून याला वैवाहिक जीवनाचे स्थान मानले जाते. म्हणूनच या काळात या लोकांचे आपल्या जीवनसाथीबरोबरचे संबंध मजबूत होऊ शकतात.
-
येणाऱ्या वर्षात मीन राशीच्या लोकांच्या कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. कुटुंबियांबरोबरचे नातेसंबंध सुधारू शकतात. तसेच, जे लोक अविवाहित आहेत, त्यांना शुभ वार्ता मिळू शकते.
-
केतू ग्रहाचे राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायाच्यादृष्टीने शुभ सिद्ध होऊ शकते. या राशीच्या नवव्या घरात ही संक्रमण होणार आहे, यालाच भाग्य आणि परदेशाचे स्थान मानले जाते.
-
म्हणूनच येणाऱ्या वर्षात मकर राशीच्या लोकांना नाशिबाची विशेष साथ मिळू शकते. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. धार्मिक गोष्टीतील रस वाढू शकतो, त्याचबरोबर वडिलांबरोबरचे संबंध मजबूत होऊ शकतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत