-
ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्त्वं आहे. आपल्या कुंडलीतील ग्रह कुठल्या राशीत आहेत यावर आपल्या जीवनातील घडामोडी ठरल्या असतात.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट काळानंतर अस्त पावतो. अस्त पावलेल्या ग्रहाचा नंतर उदय होतो. जेव्हा ग्रहाचा अस्त आणि उदय होतो सर्व राशींवर त्याचा प्रभाव पडतो .
-
देवगुरु एप्रिलमध्ये मीन राशीत उदयास येईल. या दरम्यान ‘केंद्र त्रिकोणी राजयोग’ तयार होत आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल.
-
पण अशा काही राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. काही राशींच्या लोकांसाठी धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
गुरूच्या उदयापासून तयार झालेला केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बृहस्पति तुमच्या राशीतून दहाव्या भावात उदयास येईल. त्यामुळे बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
-
तसेच, जे नोकरी करत आहेत त्यांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. त्याचबरोबर तुमच्या कुंडलीत हंस राजयोगही तयार होत आहे. यामुळे तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल.
-
केंद्र त्रिकोण राजयोग कर्क राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. गुरु ग्रह तुमच्या राशीतून नवव्या घरात भ्रमण करणार आहे. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान ठरु शकता. याकाळात तुमची रखडलेली कामे मार्गी लागू शकतात.
-
गुरु उदय या लोकांचे भाग्य घडवू शकते. कामात यश मिळू शकतो. करिअर-व्यवसायासाठी प्रवास होऊ शकतो, त्यामुळे चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
-
कुंभ राशीच्या लोकांना त्रिकोण राजयोगाचा लाभ होऊ शकतो. गुरूच्या उदयामुळे या राशीच्या लोकांनाही शुभ परिणाम मिळू शकतात. तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात गुरुचा उदय होणार आहे. म्हणून, यावेळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
-
नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. बढतीची शक्यता निर्माण होत आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. यासोबतच १७ जानेवारीपासून तुम्हाला शनीच्या साडेसतीपासूनही मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
-
( वरील माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल