-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह प्रत्येक महिन्यात राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्याचा परिणाम मानवी आयुष्यावर होतो.
-
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार एप्रिल महिना हा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांमध्ये सूर्य, गुरु, शुक्र ग्रह गोचर करून राशी बदल करणार आहेत.
-
या गोचरांसह काही अत्यंत शुभ आणि लाभदायक महायोग, राजयोग तयार होणार आहेत. काही राशींचं नशीब अगदी सूर्याप्रमाणे चमकू शकतं. एप्रिल २०२३ मध्ये कोणते ग्रह राशी बदल करणार पाहूया.
-
एप्रिल महिन्यात सर्वात आधी शुक्र गोचर होणार आहे. शुक्र देव मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश घेणार आहेत. ६ एप्रिल २०२३ ला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी हा राशीबदल होणार असून २ मे पर्यंत शुक्र वृषभ राशीत असणार आहे.
-
दुसरं महत्त्वाचं गोचर सूर्य गोचर होणार आहे. १४ एप्रिल २०२३ ला दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी सूर्यदेव मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करणार आहेत. १५ मे पर्यंत सूर्य देव मेष राशीत स्थिर असणार आहेत.
-
या महिन्यातील तिसरा गोचर गुरु गोचर आहे. गुरु ग्रह शनिवारी २२ एप्रिल २०२३ ला सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. १ मे पर्यंत गुरु ग्रह मेष राशीत असणार आहे.
-
एप्रिल महिन्यात मेष राशीमध्ये गुरु, राहू, सूर्य, बुध यांची युती होणार आहे. या युतीतून गुरूचा राजयोग व चतुर्ग्रह योग्य निर्माण होणार आहे. चला तर जाणून घेऊया एप्रिल महिन्यात कोणत्या राशींचे भाग्य चमकणार…
-
या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना लाभदायक ठरु शकतो. तुमचे रखडलेले काम या महिन्यात पूर्ण होऊ शकते. कौटुंबात संमिश्र वातावरण असेल.
-
यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात.
-
गुरु ग्रह २२ एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गुरुसह राहू, हर्षल आणि रवीचं भ्रमण असणार आहे. या ग्रह गोचरमुळे तुमच्या राशीवर परिणाम दिसून येणार आहे.
-
अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या पदोन्नतीच्या संधीही निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर मानसन्मानही प्राप्त होऊ शकतो.
-
लाभ स्थानातील स्वगृहीचा शुक्र या राशीतील लोकांना आर्थिक लाभ करून देईल. २१ एप्रिलला गुरू आपल्या दशमातील मेष राशीत प्रवेश करेल. त्यामुळे तुम्हाला महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात.
-
विद्यार्थ्यांना मेहनतीचा फळ मिळू शकतो. हा महिना तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो. अडकलेले पैसे या महिन्यात परत मिळू शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा