-
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश (Grah Gochar) करतो किंवा संयोग करतो तेव्हा त्याचा थेट मानवी जीवनावर परिणाम होतो.
-
काही वेळा ग्रह एकाच वेळी एकाच राशीत येत असल्याने यातून काही शुभ व दुर्लभ योग सुद्धा साकारले जातात. असाच एक लाभदायक योग म्हणजेच ‘बुधादित्य राजयोग’ तयार होत आहे.
-
१४ एप्रिल रोजी सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करेल त्यावेळी आधीपासून मेष राशीत असलेला बुध सूर्याशी संयोग करेल, ज्यामुळे ‘बुधादित्य राजयोग’ तयार होईल.
-
बुधादित्य राजयोग हा तीन राशींच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
-
बुधादित्य राजयोग हा आपल्यासाठी सुखद आणि लाभकारी ठरु शकतो. बुध व सूर्याची युती आपल्या राशीच्या लग्न स्थानी तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला येत्या काळात इतर म्हणजेच तुमचे जोडीदार किंवा व्यसायातील भागीदार यांच्या रूपात आर्थिक लाभ होऊ शकतो.
-
सूर्य देव तुमच्या राशीच्या शिक्षण, प्रेम व नात्यांच्या बांधणीचे स्वामी आहेत. बुध ग्रह हा साहस, पराक्रम, रोग व शत्रू यांचा कारक आहे. याकाळात तुम्हाला स्पर्धापरिक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
-
बुधादित्य राजयोग हा आपल्या राशीचं कर्मस्थानी तयार होत आहे यामुळे आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये कामाचे माध्यम बदलले जाणवून येऊ शकते. या नव्या मार्गाने तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.
-
बुध ग्रह तुमच्या गोचर कुंडलीच्या बाराव्या स्थानिकाचे म्हणजेच साहस व पराक्रम स्थानाचे कारक आहेत. यामुळे तुम्हाला येत्या काळात काही अत्यंत महत्त्वाचे व मोठे निर्णय घेण्यासाठी तयार राहावे लागेल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते.
-
बुधादित्य राजयोग हा सिंह राशीच्या भाग्य व कर्म स्थानी तयार होत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची भक्कम साथ लाभू शकते. तुम्ही आजवर कामाच्या ठिकाणी घेतलेल्या अपार कष्टाचे गोड फळ तुम्हाला येत्या काळात मिळणार आहे.
-
तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खुश झाल्याने तुमच्या भाग्यात पदोन्नती व पगारवाढीचा संकेत आहेत. तुमच्या राशीत बुध ग्रह हा धन व आर्थिक प्राप्तीचा स्वामी मानला जातो. यामुळे बुधाच्या आशीर्वादाने तुम्हाला अपार धनलाभ व श्रीमंतीची संधी मिळू शकते.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी