-
पाणी पुरी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. पावसाळ्यात बाहेरची पाणी पुरी खाऊ नये असे म्हटले जाते. (Photo : Pexels)
-
तुम्हाला पावसाळ्यात पाणी पुरी खायची असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आणि घरच्या घरी पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकता. (Photo : Pexels)
-
घरी पाणी पुरी कशी बनवायची? त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा (Photo : Pexels)
-
साहित्य : गूळ, हिरव्या मिरच्या, मीठ, लिंबाचा रस, लवंगा,
पाणी, मिरपूड, लाल तिखट, पुदिना, जीरे, चिंच,
आल्याचा तुकडा (Photo : Pexels) -
सारणासाठी : मोड आलेले हळद घालून वाफवलेले मूग आणि २-३ उकळलेले बटाटे (Photo : Pexels)
-
चिंचेचा कोळ तयार करा. (photo : Instagram)
-
मिरच्या, पुदिना, जिरे, लवंगा, मिरपूड, तिखट, आले, मीठ एकत्र करुन बारीक चटणी तयार करा. (photo : Instagram)
-
ही चटणी, चिंचेचा कोळ आणि गूळ एकत्र करावा. त्यात थोडे पाणी टाकावे या पाण्यात लिंबाचा रस घालावा. (photo : Instagram)
-
प्रत्येक पुरी वरच्या बाजूने फोडावी. त्यात मूग व थोडा बटाट्याचा चुरा भरुन पाण्यात बुडवून पाणीपुरी सर्व्ह करावी. (photo : Instagram)

राज ठाकरेंबरोबर राजकारणात युती करण्याबद्दल उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, “आता कोणतीही…”