-
डोळे हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहेत. डोळ्यांशिवाय आपल्याला या जगाचं सौंदर्य कधीच अनुभवता येणार नाही.
-
डोळ्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. काहींचे डोळे अतिशय सुंदर, बोलके आणि पाणीदार असतात पण अशा या सुंदर डोळ्यांखाली जर का काळे डाग दिसू लागले तर?
-
डार्क सर्कल’ म्हणजेच डोळ्यांखालील काळे डाग हे आपल्या डोळ्यांचे सौंदर्य कमी करतात. तुम्हीदेखील ही समस्या अनुभवली आहे का? पण आता काळजी करू नका; कारण आम्ही तुमची ही समस्या सोडविण्यासाठी मदत करणार आहोत.
-
दही आणि हळद यांचे एकत्र मिश्रण करून त्याचा लेप डोळ्यांखाली लावल्यास काळे डाग कमी होऊ शकतात. पण लेप लावताना डोळ्यांना त्रास होणार नाही
-
टोमॅटोचा रस काढून त्यात लिंबाचा एक चमचा रस मिसळून चेहऱ्याला लावल्यास काळे डागक मी होण्यास मदत होऊ शकते. हा रस लावताना काळजी घ्या.
-
-
थंड दूध डोळ्यांखाली लावल्यानेदेखील काळे डाग कमी होऊ शकतात.
-
बटाट्याचा रस काढून, त्यात लिंबाचा रस मिसळून डोळ्यांखाली लावल्यास काळे डाग कमी होण्यास मदत होऊ शकते. हा रस काळजीपूर्वक डोळ्यांखाली लावा.
-
संत्र्याची साल उन्हात सुकवून घेऊन त्याची पावडर करून घ्यावी. त्यामध्ये थोडे गुलाबजल मिसळून त्याचा लेप तयार करून चेहऱ्याला लावा, जेणेकरून डोळ्यांखालील काळे डाग कमी होऊ शकतात.
