-
किचन सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवल्यामुळे बऱ्याचदा सिंक चोकअप होते आणि त्यात पाणी साठून राहते. परिणामी अनेकदा दुर्गंधीचा सामना करावा लागतो. (Photo : Pexels)
-
लोक बऱ्याचदा किचन साफ करतात; पण जाम झालेले किचन सिंक साफ करण्यासाठी नेहमी प्लंबरला बोलवावे लागते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत; ज्या वापरून तुम्ही जाम झालेले किचन सिंक अवघ्या काही मिनिटांत साफ करू शकता. (Photo : Pexels)
-
त्यासाठी तुम्हाला प्लंबरला बोलावण्याचीही गरज भासणार नाही. त्यामुळे किचन सिंकमधील चोकअप काढण्याच्या टिप्स जाणून घेऊ …. (Photo : Pexels)
-
ब्लॉक झालेले किचन सिंक साफ करण्यासाठी कॉफी हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला कॉफी पावडरसोबत लिक्विड सोप व गरम पाण्याची गरज लागेल. (Photo : Pexels)
-
किचनमधील सिंकमधून जर नीट पाणी जात नसेल, तर सर्वप्रथम त्यात कॉफी पावडर व लिक्विड सोप टाका. त्यानंतर त्यावर गरम पाणी ओता. असे केल्याने सिंकमध्ये भरलेली घाण बाहेर येईल आणि त्यासोबतच सिंकमधून येणारा वासही निघून जाईल. (Photo : Pexels)
-
किचन सिंकमधील घाण काढण्यासाठी व्हिनेगर व बेकिंग सोडा यांचाही तुम्ही वापर करू शकता. त्यासाठी आधी किचन सिंकमध्ये बेकिंग सोडा टाका आणि त्यानंतर त्यात व्हिनेगर टाका. (Photo : Pexels)
-
त्यामुळे सिंकमधील साचलेली घाण सहज निघून जाईल. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल, तर तुम्ही त्याऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता. त्यामुळे सिंकमधील साचलेली घाण सहज निघून जाईल. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल, तर तुम्ही त्याऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता. (Photo : Pexels)
-
तुम्ही एका आठवड्याने किंवा १० दिवसांनी किचनमधील सिंक साफ करा. त्यामुळे सिंक कायम चमकत राहील. यात किचन सिंक जाम होण्यापासून टाळण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. (Photo : Pexels)
-
उदाहरणार्थ- तुम्ही सिंकमध्ये भांडी ठेवण्याआधी त्यातील उरलेले अन्न पाण्याने स्वच्छ करा. त्यासोबतच सिंक ड्रेनवर जाळीचे कव्हर टाका; जेणेकरून कचरा किंवा उरलेले अन्नपदार्थ ड्रेनेज पाईपच्या आत जाणार नाहीत. (Photo : Pexels)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग