-
आरसा ही अशी वस्तू आहे की, जी प्रत्येकाच्या घरी असते. क्वचितच कोणी असेल की, ज्याच्या घरी आरसा नाही. (Photo : Freepik)
-
घरातून बाहेर पडताना प्रत्येक व्यक्ती एकदा तरी आरशासमोर उभी राहते आणि स्वत:ला पाहते. आरशासमोर स्वत:चे रूप न्याहाळणे अनेकांना आवडते. (Photo : Freepik)
-
आपण कसे दिसतोय, याची उत्सुकता प्रत्येकाला असते. त्यामुळे आरशाचा वापर प्रत्येक जण करतो. (Photo : Freepik)
-
अनेकदा घर स्वच्छ करताना आरसा स्वच्छ करायला मात्र आपण विसरून जातो. (Photo : Freepik)
-
बरेच दिवस आरसा स्वच्छ न केल्यामुळे आरशावर डाग पडतात. आरसा स्वच्छ करताना अनेक जण काही चुका करतात आणि त्यामुळे आरशावर आणखी डाग पडतात. (Photo : Freepik)
-
धूसर आरसा कसा स्वच्छ कसा करायचा, हा प्रश्न तुम्हाला पडतो का? टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अगदी सोपा उपाय सांगणार आहोत. (Photo : Freepik)
-
तुम्ही बटाट्याच्या मदतीने आरसा स्वच्छ करू शकता. तुम्हाला वाटेल हे कसे शक्य आहे? पण, हे खरेय. (Photo : Freepik)
-
सहसा बटाटा आपण खातो; पण बटाट्याचा वापर आरसा स्वच्छ करण्यासाठीसुद्धा केला जातो. (Photo : Freepik)
-
एक बटाटा घ्या. या बटाट्याला मधोमध कापून घ्या. बटाट्याचा पांढरा भाग खराब आरशावर घासा. नीट घासल्यानंतर आरसा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. (Photo : Freepik)
“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”