-
वैदिक पंचांगानुसार यंदा दिवाळी १२ नोव्हेंबरला साजरी होणार असून यावर्षी दिवाळीला ४ राजयोग तयार होणार आहेत.
-
ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाने षष्ठ राजयोगाची निर्मिती केली असून मंगळ आणि सूर्याच्या संयोगामुळे आणखी एक राजयोग तयार होणार आहे. तसेच आयुष्मान योगही तयार होत आहे, तर शनिदेव स्वराशी कुंभमध्ये राहून षष्ठ राजयोग राजयोग तयार करत आहेत.
-
अशाप्रकारे या दिवाळीला चार राजयोग तयार होत आहेत. या राजयोगांमुळे तीन राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असू शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
-
मकर : या राशीच्या लोकांसाठी तयार होणारे चार राजयोग अतिशय शुभ सिद्ध होऊ शकतात. या लोकांना अचानक धनलाभ संभवतो. तसेच नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी उपलब्ध झाल्याने मिळकतीत वाढ होऊ शकते.
-
जोडीदाराबरोबरचे नाते दृढ होऊ शकते. याशिवाय रखडलेली कामए मार्गी लागल्याने आनंदी वातावरण राहील. जुन्या गुंतवणूकीमधून फायदा संभवतो.
-
मिथुन : चार राजयोगांची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. यावेळी या लोकांना भाग्याची साथ मिळू शकते. याव्यतिरिक्त काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी केलेला प्रवास शुभ सिद्ध होऊ शकतो.
-
नोकरदारांना नोकरीत यश मिळण्याची शक्यता असून परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तसेच यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
-
मेष : या राशीच्या लोकांसाठी तयार होणारे हे चार राजयोग वरदान सिद्ध होऊ शकतात. याचे कारण म्हणजे या राशीमध्ये ३० ऑक्टोबर रोजी तयार झालेला गुरु चांडाळ योग संपणार आहे.
-
तसेच, शनिदेव या राशीच्या उत्पन्नाच्या घरातून भ्रमण करत असल्याने उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. यावेळी जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : फ्रीपिक)

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग