-
अंजीर हे अत्यंत फायदेशीर फळ असून सुपरफूड मानले जाते. आपल्या नियमित डाएटमध्ये अंजीरचा समावेश करून घेणे उत्तम ठरते. (फोटो : Freepik)
-
केवळ १ वा २ अंजीर रात्री पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी आणि फुगलेले अंजीर खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. (फोटो : Freepik)
-
जर तुम्हालाही सतत अशक्तपणा येत असेल तर तुम्ही भिजवलेल्या अंजीराचा आहारात समावेश करु शकता. (फोटो : Freepik)
-
टाइप २ डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी रोज भिजलेले अंजीर खाण्यामुळे ब्लड शुगरच्या पातळीत कमतरता येते आणि शुगर नियंत्रित होते.(फोटो : Freepik)
-
अंजीर पाणी आणि अंजीर खाल्ल्याने प्रजनन अवयव निरोगी राहतात. अंजीरमध्ये अनेक आवश्यक खनिजे असतात.(फोटो : Freepik)
-
अंजीरमध्ये पोटॅशियम जास्त असते. तसेच, अंजीरमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. (फोटो : Freepik)
-
अंजीरमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अंजीर जरूर खावे. हे आहारासाठी चांगले आहे. (फोटो : Freepik)
-
आपल्या डाएटमध्ये अंजीरच्या पाण्याचे समावेश केल्यामुळे शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. (फोटो : Freepik)
-
वजन कमी करण्यासाठी शरीराला जास्त फायबर असणाऱ्या पदार्थांची आवश्यकता असते आणि अंजीरमधून ते अधिक प्रमाणात शरीराला मिळते. त्यामुळे वजन कमी करण्याकरिता सकाळी उपाशीपोटी अंजीराचे पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (फोटो : Freepik)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”