-
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी सक्रिय जीवनशैली असणे अत्यंत आवश्यक आहे.
-
जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीराला ऊर्जेचा सोपा स्रोत लागतो
-
जर तुम्हाला वर्कआउट करताना चक्कर येत असेल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप कमी आहे. प्री-वर्कआउट स्नॅक्स रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते. जे तुमच्या वर्कआउट दरम्यान ऊर्जा राखण्यासाठी आणि थकवा टाळण्यासाठी महत्वाचे आहे.
-
प्री-वर्कआउट स्नॅक्स तुमच्या स्नायूंमधील ग्लायकोजेन स्टोअर्स पुन्हा भरण्यास मदत करतात. तसेच हे व्यायामानंतर स्नायू दुखणे आणि थकवा कमी करतात.
-
प्री-वर्कआउट स्नॅक्स व्यायामादरम्यान आपल्या स्नायूंचे संरक्षण करण्यास मदत करतात.
-
फळे आणि भाज्याच्या सेवनाने शरीर चांगल्या प्रकारे हायड्रेटेड राहते, व्यायामासाठी शरीराल हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे.
-
कॉफीचे सेवन तुम्हाला तुमच्या व्यायामादरम्यान दरम्यान सतर्क आणि प्रेरित राहण्यास मदत करू शकते. मात्र, अती कॉफीची सवयही शरीरासाठी घातक आहे.
-
बदाम लोणी सह केळी
केळीमध्ये सहज पचण्याजोगे कर्बोदके असतात, जे शरीराला जलद ऊर्जा देतात. -
बेरी सह ग्रीक दही
ब्ल्यू बेरी प्रथिने युक्त पदार्थ आहे ज्यामध्ये प्रोबायोटिक्स देखील असतात, यांचे सेवन आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ज्यांना वर्कआउट करताना अपचनाचा त्रास होतो त्यांनी ब्ल्यू बेरीमध्ये दही मिसळून त्याचे सेवन करावे. -
ओट्सचे जाडे भरडे पीठ कार्बोहायड्रेट आहे जे शरीरात ऊर्जा निर्माण करते. ओट्सबरोबर बदाम किंवा अक्रोड सेवन केल्याने शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने मिळतात. सुकामेवा, जसे की मनुका किंवा जर्दाळू, तात्काळ उर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.
-
व्यायामाच्या ३० मिनिटे ते २ तास आधी नाश्ता करण्याचा सल्ला तज्ञ देतात.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक