ी
-
हिवाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये याबाबच अनेकजण विचार करतात. हिवाळ्यात केळी खाल्ल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो अशी शंका अनेकांना असते.
-
पण योग्य प्रमाणात केळी खाणे आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर आहे. केळी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.
-
केळ्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात. हे पोषक घटक शरीरातील ऊर्जा पातळी वाढवण्यास हातभार लावतात.
-
हिवाळ्यात हाडांशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी केळी खाणे फायदेशीर ठरू शकते.
-
केळी उर्जेचा नैसर्गिक स्रोत म्हणून काम करते. दुपारी याचे सेवन केल्याने हिवाळ्यात तुमची उर्जा टिकून राहते.
-
अनेकांना झोपेसबधीत समस्या असतात. त्यामुळे यावर उपाय म्हणून संध्याकाळी एक-दोन केळी खाल्ल्यास रात्रभर चांगली झोप येईल.
-
केळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते पचनक्रिया सुलभ करते.