-
भेंडी ही भाजी व्हिटॅमिन – ए, सी, फॉलेट, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारख्या पोषकतत्त्वांनी भरपूर आहे.
-
हिवाळ्यात भेंडी खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात, जाणून घेऊया.
-
हिवाळ्यात भेंडीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी खोकला यांसारख्या हंगामी आजारांपासून बचाव होतो.
-
भेंडीमधील फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्टता टाळते. तसेच हे फायबर कॉलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
-
हिवाळ्यात भेंडीचे सेवन केल्यास त्वचेचा पोत सुधारतो तसेच हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्यापासून प्रतिबंध होतो.
-
भेंडीमध्ये असणारे पोषकतत्त्व रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात.
-
डोळ्यांचे आरोग्य आणि नजर सुधारण्यात भेंडी गुणकारी मानली जाते.
-
हिवाळ्यात शरीराला ऊब मिळवून देण्यासाठी भेंडी मदत करू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Unsplash)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक