-
आजच्या स्पर्धात्मक युगात आपण सगळेच चोवीस तास धावतो. यामुळे आपल्या आहार आणि झोपेच्या समस्या नेहमीच उद्भवतात.
-
साहजिकच याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आपल्याला आजाराला सामोरे जावे लागते.
-
आतापर्यंत तुम्ही झोपेच्या कमतरतेचे अनेक दुष्परिणाम ऐकले असतील. पण एका संशोधनात समोर आलेली माहिती वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
-
फक्त एका रात्रीची झोप कमी झाल्याने तुमचा मेंदूचे दोन वर्षांनी वाढू शकते. विश्वास बसत नाही ना? पण ते खरे आहे. अर्धवट झोपेमुळे तुमचे वय लवकर वाढते.
-
अर्धवट झोपेमुळे शरीर लवकर थकते आणि वृद्धापकाळाकडे वाटचाल करू लागते. तज्ज्ञांच्या मते कार्य, ऊर्जा, भावनिक संतुलन आणि एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप आवश्यक आहे.
-
अनेकांना निद्रानाश, लवकर झोप न येणे यासारख्या समस्या असतात. अशा लोकांनी पुस्तके वाचण्याची सवय लावा.
-
चांगल्या आरोग्यासाठी रात्री नियमित ७-८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
-
पुरेशी झोप घेतल्याने हृदय निरोगी राहते. अपुऱ्या झोपेचा संबंध अनियमित रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टेरॉलशी आहे.
-
पुरेशी झोप घेतल्याने तणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी राहते. स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली