-
ऑफिसमध्ये डेस्कवर काम करणाऱ्यांना त्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय जागेवरून उठता येत नाही. तसेच लॉकडाऊन पासून सुरु झालेली वर्क फ्रॉम होम ही कामाची पद्धत अजूनही काही कंपन्यांमध्ये सुरुच आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे ऑफिसमध्ये काम करणे असो किंवा वर्क फ्रॉम होम असो दीर्घ काळ बसणे आणि बराच वेळ काम केल्यामुळे अनेकांना पाठ, मान, गुडघेदुखी या समस्यांना सामोरे जावे लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अनेकांचा सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असा हा ऑफिस टाईम असतो. यामध्ये काही वर्क फ्रॉम होम तर काही दररोज ऑफिसला जाऊन काम करणारे कर्मचारी असतात. पण, रोज तासनतास एकाच ठिकाणी बसून राहिल्याने हळूहळू आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होताना दिसतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर यावर उपाय म्हणून तुम्ही पुढील काही गोष्टींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
स्ट्रेचिंगचा सराव करा : स्नायूंना आराम देण्यासाठी स्ट्रेचिंग केले जाते. त्यामुळे डेस्कवर काम करताना कोणते स्ट्रेचिंग व्यायाम करणे शक्य असेल ते करा. यामुळे शरीराची लवचिकता टिकून राहील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पौष्टिक स्नॅक्स खा : दिवसभरातील थकवा दूर करण्यासाठी आणि तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी पौष्टिक अन्न, स्नॅक्स मदत करेल ; यामुळे पौष्टिक अन्नाचे नियमित सेवन करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पाणी प्या : हायड्रेटेड राहण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. हायड्रेटेड राहिल्याने तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नियमित ब्रेक घ्या: दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्याने स्नायूंवर ताण येतो किंवा वेदना जाणवू लागतात. त्यामुळे शरीराची हालचाल करणे गरजेचं आहे; यासाठी नियमित विश्रांती घ्या. थोडा वेळ घरात फेरफटका मारा किंवा थोडा वेळ उभं राहून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करा : तुमचे शरीर सक्रिय ठेवण्यासाठी लिफ्टचा उपयोग करणे टाळा आणि दररोज पायऱ्या चढा. (फोटो सौजन्य: @Freepik)

१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ