-
Eat apple in 4 ways : आजारांपासून दूर राहण्यासाठी डॉक्टर सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने व्यक्ती दीर्घकाळापर्यंत आजारांपासून लांब राहतो. (Photo: Freepik)
-
सफरचंद खात असताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे नाहितर फायद्यांएवजी नुकसान होण्याची शक्यता असते.(Photo: Freepik)
-
सफरचंद प्रत्येक ऋतूत मिळत असले तरी हिवाळ्यात खास करुन चांगले सफरचंद पाहायला मिळतात. सफरचंद अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. (Photo: Freepik)
-
आहारतज्ञांच्या मते, सफरचंद खाताना आपण अनेकदा काही चुका करतो. त्यामुळे सफरचंद खाताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या.(Photo: Freepik)
-
ज्या लोकांना गॅस आणि अपचन म्हणजेच पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी रिकाम्या पोटी सफरचंद खाणे टाळावे. जेवणानंतर २ तासांनी सफरचंद खावे.(Photo: Freepik)
-
काही लोक दुग्धजन्य पदार्थांसह सफरचंद खातात. जसे सफरचंद दूध, दही, चीज, लोण्यासोबत खाणे. पण असे करणे टाळले पाहिजे. (Photo: Freepik)
-
सफरचंद खात असताना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते ते म्हणजे कापल्यानंतर लगेचच सफरचंद खावे लागते. अन्यथा त्यावर हळहळू तांबूस व काळा रंग चढू लागतो. (Photo: Freepik)
-
सफरचंद खाताना सोलून खावे. कारण अनेकदा विक्रेते सफरचंद चमकदार दिसावे म्हणून सालीवर मेण वापरतात. यामुळे फळ खाण्याआधी स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे.(Photo: Freepik)
-
जर तुम्ही तुमच्या मुलाला जेवणाच्या डब्यात सफरचंद देत असाल तर त्यात चिमूटभर मीठ टाका. असे केल्याने सफरचंद पिवळे किंवा तपकिरी होणार नाही. सफरचंद खाण्यापूर्वी ते चांगले धुवा.(Photo: Freepik)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…