-
तुम्ही अनेकांना तांब्याच्या भांड्यातून किंवा ग्लासातून पाणी पिताना पाहिले असेल. भारतीय परंपरेत तांब्याच्या भांड्यांना खूप महत्त्व आहे
-
तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने केवळ रोगप्रतिकारक शक्तीच मजबूत होत नाही तर पचनक्रियाही मजबूत होते, असे अनेकदा म्हटले जाते.
-
जे लोक तांब्याच्या भांड्यात पाणी पितात ते अनेकदा काही चुका करतात ज्या टाळणे फार महत्वाचे आहे.
-
तांब्याच्या भांड्यांचा वापर स्वयंपाक घरात जेवण बनवण्यापासून ते पिण्याचे पाणी भरुन ठेवण्यासाठी केला जातो. याचे अनेक फायदे आहेत, आता हे किती खरे आहे ते जाणून घेऊया.
-
आरोग्य तज्ञांच्या मते, तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. पण यावेळी काही चुका टाळायला हव्यात
-
तांब्याच्या भांड्यातील पाणी दिवसभर पिऊ नये. दिवसभर पाणी प्यायल्याने शरीरातील कॉपरचे प्रमाण वाढते. त्यामुळे चक्कर येणे, पोटदुखी, किडनी निकामी होणे अशा गंभीर समस्या निर्माण होतात.
-
तसेच तांब्याच्या भांड्यात चुकूनही लिंबू किंवा मध मिसळू नका. कारण हे दोघे मिळून विष बनतात. ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
-
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने ॲसिडिटीची तक्रार वारंवार होते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी जास्त पिऊ नका.
-
तांब्याच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवू नका. अनेकदा यामुळे विषबाधा होण्याचा धोका असतो. मूत्रपिंड आणि हृदयासंबंधीत आजार असलेलया रुग्णांनी तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल