-
सूर्याच्या अतिनील किरणांमुळे तुमच्या त्वचेला गंभीर नुकसान होऊ शकते. या किरणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास सनबर्न, टॅनिंग, सुरकुत्या आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
-
यासाठी काही लोक सनस्क्रीन तर काहीजण सनब्लॉक वापरतात. पण तुमच्या त्वचेसाठी कोणते चांगले आहे?
-
सनस्क्रीन म्हणजे काय?
नस्क्रीनबद्दल ते स्कीन लोशनसारखे असते, जे त्वचेवर अप्लाय केल्यानंतर त्वचेवर एक पातळ लेअर तयार होते आणि सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. -
सनस्क्रीन अनेक ऑरगॅनिक केमिकल संयुगांनी बनलेले असते, जे अतिनील प्रकाशाच्या संपर्कात असताना केमिकल प्रोटेक्टर म्हणून काम करतात आणि ते शोषून घेतात, ज्यामुळे त्वचेवर प्रतिकूल परिणाम होण्यापासून प्रतिबंधित होते.
-
सनब्लॉक म्हणजे काय?
एक सनब्लॉक त्वचेवर लावल्यानंतर त्याचा एक जाड थर बनवतो आणि नावाप्रमाणेच सनब्लॉक यूव्ही किरण त्वचेपर्यंत पोहोचण्याआधीच ब्लॉक करतो. हे सनस्क्रीनपेक्षा जाड असते. हे झिंक ऑक्साईड, टायटॅनियम डायऑक्साइड सारख्या विविध खनिज घटकांचा वापर करून बनवले जाते, जे त्वचेच्या संपर्कात येण्यापूर्वी अतिनील किरणांना भौतिकरित्या अवरोधित करतात. -
कोणते चांगले आहे?
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन आणि सनब्लॉक दोन्ही कार्य करतात, म्हणून ते दोन्ही तुमच्यासाठी चांगले आहेत. पण, तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी एक निवडू शकता. -
लाइक-सनस्क्रीनचा थर पातळ असतो आणि त्वचेवर थोड्या काळासाठी राहतो. याचा अर्थ असा की, जर तुम्ही जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहणार असाल तर तुम्हाला वारंवार सनस्क्रीन लावावे लागेल.
-
पण सनब्लॉकचा थर जाड असतो ज्यामुळे तो त्वचेवर एकदा लावल्यानंंतर त्याचा परिणाम त्वचेवर बराच काळ राहतो. पण सनब्लॉक त्वचेवर दिसून येतो. ज्या लोकांना सूर्यप्रकाशास जास्तव वेळ राहिल्यास पुरळ उठतात, एॅलर्जी होते त्यांच्यासाठी सनब्लॉक सर्वोत्तम आहे.
-
जर तुम्ही पोहायला जात असाल तर अशावेळी तुम्ही सनब्लॉक वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते. उन्हाळ्यात विशेषतः सनब्लॉक वापरणे चांगले.

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख