-
आपल्या त्वचेची काळजी घेणं ही एक चांगली सवय आहे. मात्र स्किन केअर रुटीनमध्ये बहुतांश महिला काही अशा चुका करतात, ज्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होते व चेहऱ्यावरील चमक हळूहळू कमी होत जाते.(Photo: Freepik)
-
नोकरी करणाऱ्या महिलांना रोज रोज स्किन केअर रुटीन करणं शक्य होत नाही. मात्र नोकरदार महिलांनो आता काळजी करु नका, कारण सुट्टीच्या दिवशी करण्यासारखं अगदी सोप्पं असं स्कीन केअर रुटीन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Photo: Freepik)
-
सर्वात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करणे खूप म्हत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकाराला साजेसे हलके क्लिन्जर वापरा. यानंतर, हलक्या फेस स्क्रबने तुमच्या चेहऱ्याला वर्तुळाकार गतीने मसाज करा, त्यानंतर त्वचा थंड पाण्याने धुवा.(Photo: Freepik)
-
फेस मास्क – हे स्किनकेअर रूटीन फेस मास्कशिवाय अपूर्ण आहे. हे केवळ त्वचेला पोषक द्रव्ये शोषून घेण्यास मदत करत नाही तर त्वचेला आराम देण्यासही मदत करते. तुमच्या त्वचेसाठी योग्य असा फेस मास्क निवडा. (Photo: Freepik)
-
मॉइश्चरायझेशन – त्वचा स्वच्छ झाली की तिला पुन्हा हायड्रेशनची गरज असते. अशा परिस्थितीत, हायड्रेटिंग टोनर लावा जेणेकरून त्वचा मॉइश्चरायझ होईल.(Photo: Freepik)
-
डार्क सर्कल – जर एखाद्याला डार्क सर्कलची समस्या असेल तर आय क्रीम लावा. लक्षात ठेवा की या भागाला अतिशय हलक्या हाताने मसाज करा. तसेच, डोळ्यांशी थेट संपर्क टाळा. (Photo: Freepik)
-
आय क्रीम्स नाजूक त्वचेला हायड्रेट करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात.(Photo: Freepik)
-
सन प्रोटेक्शन – जरी तुम्ही वीकेंड मोडमध्ये असाल आणि फिरायला गेला असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. (Photo: Freepik)
-
शेवटी, तुम्हाला SPF 30 असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावावे लागेल. हे त्वचेचे हानिकारक किरणांपासून संरक्षण करते.(Photo: Freepik)
Pragya Singh Thakur : “अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुब्रह्मण्यम स्वामींच्या घरातील मुलींचे पाय कधी तोडताय?” काँग्रेस नेत्याचा प्रज्ञा ठाकुरांवर पलटवार