-
ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो.
-
शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत शनीच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर जास्त असतो. शनि ग्रह सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत विराजमान आहे.
-
२९४ दिवस शनिदेव कुंभ राशीतच विराजमान राहणार आहेत. १८ मार्च रोजी कुंभ राशीत शनिदेवाचा उदय होणार आहे. शनिदेवाच्या उदयामुळे काही राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात.
-
२९४ दिवस शनिदेवाचे कुंभ राशीत विराजमान असणे काही राशींसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणारे ठरु शकते. पाहा कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी….
-
शनिदेवाच्या हालचालीत होणारे बदल मेष राशीसाठी फायदेशीर ठरु शकते. २९४ दिवस या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते. या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. व्यावसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
-
२९४ दिवस शनिदेवाचे कुंभ राशीत असणे सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. करिअरच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. शनिदेवाच्या कृपेने कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.
-
तूळ राशीसाठी २९४ दिवस शनिदेव आनंदाच्या बातम्या घेऊन येऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच, या काळात तुमचा बँक बॅलन्स पूर्वीपेक्षा खूप चांगला असू शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : freepik\लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?