-
प्रत्येकाची सकाळची दिनचर्या सर्वोत्तम असावी. कारण दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस सुद्धा चांगला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
अनेकांना सकाळी उठल्या उठल्या पाणी पिण्याची सवय असते. तर रोज सकाळी उठून काही जण हेल्दी पेयांचे सेवन करतात ; जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर तुम्ही सुद्धा सकाळी उठल्यावर पुढील काही पेयांचे सेवन करू शकता व तुमच्या दिवसाची छान सुरुवात करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
कोमट पाण्यात ताज्या लिंबाच्या रस घाला व या पाण्याचे सकाळी सेवन करा. तुमचे शरीर हायड्रेट राहील आणि पचनास मदत सुद्धा होईल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
ग्रीन टी – थकवा जाणवत असेल तर सकाळी ग्रीन टी घ्या. यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते जे शरीराला ऊर्जा देते. तसेच शरीर आणि मनाचा ताण कमी करते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
स्मूदी – फळे, भाज्या, प्रोटीन पावडर यांचे मिश्रण करून पौष्टिक स्मूदी तयार करा व सकाळी उठल्यावर याचे सेवन करा. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
सकाळी उठल्यावर हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने त्यातील अँटी-बॅक्टेरियल आणि इम्युनोमोड्यूलेटरी प्रभावामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
ॲपल सायडर व्हिनेगर टॉनिक – ॲपल व्हिनेगरमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. टॉनिक पचन होण्यास आणि उर्जेची पातळी वाढवण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
प्रोटीन पावडर, दूध किंवा पाणी, फळे आणि भाज्या यांचे मिश्रण करून प्रथिनेयुक्त शेक तयार करा व त्याचे सकाळी उठल्यावर सेवन करा. (फोटो सौजन्य: @Freepik )

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा